पुणे : पुण्याच्या महापौर, शहराच्या प्रथम नागरिक मंजुषा नागपुरे यांना पुण्याच्या विमानतळावरच प्रवेश मिळाला नसल्याने, आता याची शहरभर चर्चा होत आहे. नियमांची पूर्तता केले नसल्याने नागपुरे यांना विमानतळावर प्रवेश नाकारण्यात आला.
राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वागतासाठी नागपुरे उपस्थित राहणार होत्या. मात्र त्यांच्याकडे विमानतळ प्रवेश पास नसल्यामुळे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. या सर्व प्रकारानंतर आता महापौरांनी प्रभारी जनसंपर्क अधिकारीवर कारवाई केल्याची चर्चा आहे.
शहरात येणाऱ्या प्रमुख पाहुणे, मंत्री महोदयांचे स्वागताला शहराचे प्रथम नागरिक म्हणून महापौरांची उपस्थिती आवश्यक असते. मात्र नागपुरे यांचा ३ वर्षांसाठी विमानतळ प्रवेश पास काढण्यात आला नव्हता. आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, छायाचित्र इत्यादी कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर हा पास दिला जातो. केवळ एका दिवसाचा पास काढायचा असेल तरीही ही प्रक्रिया आवश्यक आहे.
या पूर्वीच महापौर कार्यालयाकडून हा पास काढण्याचा आदेश जनसंपर्क अधिकाऱ्यांना दिला होता. मात्र इतक्या कमी कालावधीत पास काढणे, त्याची प्रक्रिया राबवणे शक्य झाले नाही. यामुळे आता संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा महापौरांनी उचलल्याचे सांगण्यात येते.
महापौरांचा पास काढण्याची जबाबदारी कुणाची ?
सध्या नगरसचिवपदी कार्यरत असलेल्या योगिता भोसले यांच्याकडे यापूर्वी राजशिष्टाचार अधिकारीपद होते. मात्र त्यांची नियुक्ती नगरसचिवपदी झाल्यानंतर राजशिष्टाचार अधिकारी पद अध्यापही रिक्त आहे. याचे प्रभारीपद किंवा अतिरीक्त जबाबदारी कोणाकडेच देण्यात आली नाही. त्यामुळे महापौरांचा विमानतळ प्रवेश पास काढण्याची जबाबदारी नेमकी कोणाची होती? असा पेच निर्माण झाला आहे.
Related
पुणे : पुण्याच्या महापौर, शहराच्या प्रथम नागरिक मंजुषा नागपुरे यांना पुण्याच्या विमानतळावरच प्रवेश मिळाला नसल्याने, आता याची शहरभर चर्चा होत आहे. नियमांची पूर्तता केले नसल्याने नागपुरे यांना विमानतळावर प्रवेश नाकारण्यात आला. राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वागतासाठी नागपुरे उपस्थित राहणार होत्या. मात्र त्यांच्याकडे विमानतळ प्रवेश पास नसल्यामुळे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. या सर्व प्रकारानंतर आता महापौरांनी प्रभारी जनसंपर्क अधिकारीवर कारवाई केल्याची चर्चा आहे.
महापौरांचा पास काढण्याची जबाबदारी कुणाची ?

