Mahayuti Dispute in MlC Election : नाशिक, संभाजीनगर, पुणे या तीन जागांवरुन एकमत होईना.
नवी दिल्ली : निवडणूक कोणतीही असो, राज्याच्या सत्तेत बसलेल्या महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपासाठी होणारी रस्सीखेच आणि त्यानंतर दिल्लीतली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या दरबारी हजेरी लावणं, हे समीकरण ठरलेलंच असतं.
आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कोट्यातून विधानपरिषद निवडणूक होत आहे. नाशिक, संभाजीनगर आणि पुणे या तीन जागांवरुन महायुतीत जोरदार घमासान सुरु आहे.
आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बैठकीत या जागांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दिल्लीमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला तिन्ही पक्षांचे नेते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसने तीन जागांची मागणी केली आहे. शिवसनेनला देखील अधिकच्या जागा हव्या आहेत. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी जागांवर तोडगा मुंबईतच निघेल, असे स्पष्ट केले आहे.
दिल्लीतील बैठकीनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार म्हणाल्या, "आम्ही आजच्या बैठकीत तीन जागांची मागणी केली आहे. यावर काही सकारात्मकर निर्णय होईल, असं वाटतं."
तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले," महायुतीच्या जागांबाबतचा हा विषय येत्या एक दोन दिवसात संपणार आहे. महायुती म्हणूनच निवडणूक होईल. महायुतीच सर्व जागा जिंकेल."
Related
नवी दिल्ली : निवडणूक कोणतीही असो, राज्याच्या सत्तेत बसलेल्या महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपासाठी होणारी रस्सीखेच आणि त्यानंतर दिल्लीतली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या दरबारी हजेरी लावणं, हे समीकरण ठरलेलंच असतं. आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कोट्यातून विधानपरिषद निवडणूक होत आहे. नाशिक, संभाजीनगर आणि पुणे या तीन जागांवरुन महायुतीत जोरदार घमासान सुरु आहे.

