Dailyhunt
मस्साजोगची निवडणूक बिनविरोध? देशमुखच्या पत्नींना निवडून देण्याची गावकऱ्यांची भावना!

मस्साजोगची निवडणूक बिनविरोध? देशमुखच्या पत्नींना निवडून देण्याची गावकऱ्यांची भावना!

बीड : बीड जिल्ह्यातल्या केजमधील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी क्रूरपणे हत्या करण्यात आली. देशमुख यांच्यानिधनानंतर रिक्त असलेल्या संरपंच पदासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

आज 7 एप्रिल पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

संतोष देशमुख यांच्यानंतर कोण याकडे लक्ष असले तरी, देशमुखांना श्रद्धांजली म्हणून ही निवडणूक बिनविरोध करुन संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना संधी देण्यात यावी, अशी मस्साजोगच्या ग्रामस्थांकडून भावना व्यक्त केली जात आहे.

बीड जिल्ह्यात एकूण ८८ जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. १६ सरपंच आणि ७२ सदस्य असे एकूम ८८ जागांसाठी निवडणूक होणार आहे. आज ७ एप्रिल ते १३ एप्रिलपर्यंत उमेदवारीअर्ज भरता येणार आहे. यामुळे आता मस्साजोगची जबाबदारी कुणाकडे येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

निवडणूक कार्यक्रम असा असेल -

अर्ज दाखल करण्याची मुदत - 7 ते 13 एप्रिल

अर्जाची छाननीचा दिवस - 15 एप्रिल

अर्ज माघारीची तारीख - 17 एप्रिल

मतदानाचा दिवस - 28 एप्रिल

निकाल - 29 एप्रिल


Related

बीड : बीड जिल्ह्यातल्या केजमधील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी क्रूरपणे हत्या करण्यात आली. देशमुख यांच्यानिधनानंतर रिक्त असलेल्या संरपंच पदासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. आज 7 एप्रिल पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

निवडणूक कार्यक्रम असा असेल -

अर्ज दाखल करण्याची मुदत - 7 ते 13 एप्रिल

अर्जाची छाननीचा दिवस - 15 एप्रिल

अर्ज माघारीची तारीख - 17 एप्रिल

मतदानाचा दिवस - 28 एप्रिल

निकाल - 29 एप्रिल

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Political Maharashtra