Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
MLA Amol Khatal News : बाळासाहेब थोरांताचा पराभव करणाऱ्या अमोल खताळांची आमदारकी धोक्यात?

MLA Amol Khatal News : बाळासाहेब थोरांताचा पराभव करणाऱ्या अमोल खताळांची आमदारकी धोक्यात?

MLA Amol Khatal News : खताळ यांची ही विनंती न्यायालयाने फेटाळून सावली आहे. त्यामुळे आता खताळ यांची आमदारकी धोक्यात आली का? अशी शक्यता व्यक्त होताना दिसत आहे.

संगमनेर : संगमनेर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या निवडणूक याचिकेप्रकरणी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना औरंगाबाद खंडपीठाकडे संगमनेरचे शिवसेना आमदार अमोल खताळ यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये करसंदर्भात माहिती लपवून ठेवल्याचा दावा याचिकेद्वारे केले होते. थोरांतांची ही याचिका फेटाळून लावण्यात यावी, अशी विनंती आणदार खताळ यांनी विनंती केली होती. मात्र खताळ यांची ही विनंती न्यायालयाने फेटाळून सावली आहे. त्यामुळे आता खताळ यांची आमदारकी धोक्यात आली का? अशी शक्यता व्यक्त होताना दिसत आहे.

संगमनेरचे विद्यमान शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी आपल्याविरोधात केली गेलेली याचिका प्राथमिक टप्प्यातच फेटाळून लावण्याची केलेली केली होती. मात्र खताळ यांची ही मागणी मान्य करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार असून, आमदारकीसंदर्भातील कायदेशीर लढाई कायम राहणार आहे. खताळ यांच्या डोक्यावर आता आमदार पद जाण्याचा धोका कायम राहिला आहे.

याचिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दाखल केली असून, विधानसभा निवडणुकीत झालेल्या कथित अनियमितता, कर लपवल्याचा दावा आणि निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील काही त्रुटी या मुद्द्यांवर त्यांनी खताळ यांना न्यायालयात आव्हान दिले आहे. अमोल खताळ यांच्या वतीने ही याचिका सुरुवातीलाच फेटाळण्यात यावी, असा अर्ज करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळत याचिकेमध्ये सुनावणीसाठी पुरेसे मुद्दे असल्याचे निरीक्षण नोंदवले. त्यामुळे आता या प्रकरणावर सविस्तर सुनावणी होणार आहे.

या निर्णयामुळे अमोल खताळ यांच्यासमोरील कायदेशीर आव्हान कायम राहिले असून, विरोधकांनी याकडे मोठा राजकीय विजय म्हणून पाहण्यास सुरुवात केली आहे. मात्र न्यायालयाने अद्याप आमदारकी रद्द करण्याचा कोणताही निर्णय दिलेला नाही. केवळ याचिका फेटाळण्यास नकार दिला असून, अंतिम निकाल अद्याप बाकी आहे. आगामी सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंकडून पुरावे आणि युक्तिवाद मांडले जाणार असून, त्यानंतर न्यायालय अंतिम निर्णय देईल. त्यामुळे या प्रकरणाकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


Related

संगमनेर : संगमनेर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या निवडणूक याचिकेप्रकरणी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना औरंगाबाद खंडपीठाकडे संगमनेरचे शिवसेना आमदार अमोल खताळ यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये करसंदर्भात माहिती लपवून ठेवल्याचा दावा याचिकेद्वारे केले होते. थोरांतांची ही याचिका फेटाळून लावण्यात यावी, अशी विनंती आणदार खताळ यांनी विनंती केली होती. मात्र खताळ यांची ही विनंती न्यायालयाने फेटाळून सावली आहे. त्यामुळे आता खताळ यांची आमदारकी धोक्यात आली का? अशी शक्यता व्यक्त होताना दिसत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Political Maharashtra