Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Narendra Modi On GenZ : पंतप्रधानांबबत अपशब्द काढलेल्या मुलीला मोदी दत्तक घेणार? मुलीच्या आईची मागणी काय?

Narendra Modi On GenZ : पंतप्रधानांबबत अपशब्द काढलेल्या मुलीला मोदी दत्तक घेणार? मुलीच्या आईची मागणी काय?

Narendra Modi On GenZ : पंतप्रधानांनी आपल्या मुलीला माफ केल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त करत, "मोदीजींनी माझ्या मुलीला जीवनदान दिलं," असे म्हटले आहे.

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आणि त्यांच्या दिवंगत आईविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप झालेल्या नोएडातील अल्पवयीन मुलीच्या आईने भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

पंतप्रधानांनी आपल्या मुलीला माफ केल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त करत, "मोदीजींनी माझ्या मुलीला जीवनदान दिलं," असे म्हटले आहे. मुलीच्या आईने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, "आम्ही पंतप्रधानांचे मनापासून आभारी आहोत. त्यांनी मोठेपणा दाखवत आमच्या मुलीला माफ केलं. त्यांच्यामुळे आमच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे." काही वृत्तांनुसार, त्यांनी भावनिक होत पंतप्रधान मोदींनी आपल्या मुलीला "दत्तक घ्यावं" अशीही विनंती केली.

पंतप्रधानांनी काय म्हटलं?

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंधित मुलांना "भरकटलेली मुलं" असे संबोधत त्यांना शिक्षा करण्याऐवजी योग्य मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचे सांगितले. "शिवीगाळ करून कोणताही प्रश्न सुटत नाही. चूक झाली असेल तर ती सुधारण्याची संधीही दिली पाहिजे," असा संदेश त्यांनी दिला.

मुलीचीही पुन्हा माफी -

दरम्यान, संबंधित अल्पवयीन मुलीनेही पुन्हा एकदा सार्वजनिकरित्या माफी मागितली आहे. "पंतप्रधानांनी मला माफ करणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे," असे ती म्हणाली.

सोशल मीडियावर चर्चा -

या संपूर्ण घटनेनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी पंतप्रधानांच्या भूमिकेचे कौतुक केले, तर काहींनी या प्रकरणावर वेगवेगळी राजकीय मते व्यक्त केली. दरम्यान, अल्पवयीन व्यक्तींच्या वर्तनाबाबत समाज, कुटुंब आणि शिक्षण व्यवस्थेची भूमिका यावरही चर्चा सुरू झाली आहे.


Related

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आणि त्यांच्या दिवंगत आईविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप झालेल्या नोएडातील अल्पवयीन मुलीच्या आईने भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंतप्रधानांनी आपल्या मुलीला माफ केल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त करत, "मोदीजींनी माझ्या मुलीला जीवनदान दिलं," असे म्हटले आहे. मुलीच्या आईने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, "आम्ही पंतप्रधानांचे मनापासून आभारी आहोत. त्यांनी मोठेपणा दाखवत आमच्या मुलीला माफ केलं. त्यांच्यामुळे आमच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे." काही वृत्तांनुसार, त्यांनी भावनिक होत पंतप्रधान मोदींनी आपल्या मुलीला "दत्तक घ्यावं" अशीही विनंती केली.

पंतप्रधानांनी काय म्हटलं?

मुलीचीही पुन्हा माफी -

सोशल मीडियावर चर्चा -

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Political Maharashtra