Thursday, 05 Aug, 1.16 pm Political महाराष्ट्र

होम
निवडणूकीचे रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा राजीनामा; काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?

नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा सुरु असताना निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या प्रमुख सल्लागार पदावरुन राजीनामा दिला आहे. पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. अशावेळी प्रशांत किशोर यांनी राजीनामा दिला आहे. याच वर्षी प्रशांत किशोर अमरिंदर सिंग यांचे प्रमुख सल्लागार बनले होते आणि त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देण्यात आला होता.

प्रशांत किशोर यांनी पत्र लिहून आपल्या राजीनाम्यामागचं कारण सांगितलं आहे. ते म्हणाले की त्यांनी सार्वसजिक जीवनातील सक्रिय भूमिकेतून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार सुरु आहे. याच संदर्भात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अनेकवेळा बैठकाही घेतल्या आहेत. त्यामुळे विविध तर्क लावले जात आहेत.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांना लिहिलेल्या पत्रात प्रशांत किशोर म्हणालेत, 'मी सार्वसजिक जीवनातील सक्रिय भूमिकेतून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे मी आपला प्रमुख सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळण्यास सक्षम नाही. मला माझ्या भविष्यातील कार्याबाबत निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की मला जबाबदारीतून मुक्त करण्याची कृपा करावी. या पदावर माझी निवड करण्यासाठी आणि मला संधी देण्यासाठी मी तुमचे आभार मानतो.'

प्रशांत किशोर यांनी २०१७ मध्ये पंजाब विधानसभेदरम्यान काँग्रेस निवडणुकीची धुरा सांभाळली होती. नुकतेच प्रशांत किशोर यांची कंपनी, इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमेटीने पश्चिम बंगाल निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला मोठा विजय मिळवून दिला होता. त्यांनी २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभियानाची धुरा सांभाळली होती. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्ष एकत्र येताना दिसत आहेत. पक्षांना एकत्र आणण्यात प्रशांत किशोर महत्त्वाची भूमिका बजावताना दिसताहेत.

Read Also :

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Political Maharashtra
Top