Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Noise Pollution Free Ganeshotsav : "माझा दाभोळकर झाला तरी." ; बापटांची व्यवस्थेला चापट! ध्वनी प्रदुषणमुक्त गणेशोत्सावासाठी.

Noise Pollution Free Ganeshotsav : "माझा दाभोळकर झाला तरी." ; बापटांची व्यवस्थेला चापट! ध्वनी प्रदुषणमुक्त गणेशोत्सावासाठी.

Noise Pollution Free Ganeshotsav : "संत तुकारामांनी म्हंटल्याप्रमाणे, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियाले नाही बहुमता. त्यामुळे बहुमताला मी कधीच मानत नव्हतो."

पुणे (चेतन झडपे) : गणेशोत्सवाच्या काळात होणारे ध्वनीप्रदूषण आणि डीजेच्या वाढत्या वापराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

डीजेमुक्त आणि ध्वनीप्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा व्हावा, अशी भूमिका पुण्यातील नागरिक विद्यानंद बापट यांनी पुणे महानगरपालिका सभागृहात मांडली. मात्र, बापट यांच्या या भूमिकेला काही गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून विरोध करण्यात आला.

गणेशोत्सव हा पुण्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे. उत्सवाच्या काळात मोठ्या आवाजातील डीजे, ध्वनिक्षेपक आणि इतर ध्वनीवर्धक यंत्रणांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा उपस्थित करत विद्यानंद बापट यांनी गणेशोत्सव अधिक शांततामय आणि ध्वनीप्रदूषणमुक्त पद्धतीने साजरा करण्याची गरज व्यक्त केली.

पुणे महानगरपालिका सभागृहात आपली भूमिका मांडताना बापट यांनी डीजेच्या वाढत्या वापराबाबत चिंता व्यक्त केली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपत असताना ध्वनीप्रदूषण टाळण्याची गरज असल्याचे त्यांनी मांडले.

बापट यांनी पॉलिटीकल महाराष्ट्र संवाद साधला. अशी धाडसी भूमिका मांडताना मनात कसली भीती नव्हती का? असा प्रश्न बापट यांना विचारण्यात आला. यावर बापट म्हणाले, "भीती अशी काहीच नव्हती. संत तुकारामांनी म्हंटल्याप्रमाणे, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियाले नाही बहुमता. त्यामुळे बहुमताला मी कधीच मानत नव्हतो. माझ्या विरोधात सगळे असते तरी मला त्याची फिकीरच नव्हती. माझ्यावर समजा काही हल्ला झाला तरी काय होणार? आतापर्यंत सॉक्रेटीस, हायपेशिया, तुकाराम, दाभोळकर यांच्या ओळीत माझं एक नाव आलं असतं. यात फार मोठं वगैरे मला काही वाटत नाही."

गणेशोत्सव मंडळ कार्यकर्त्यांकडून विरोध -

मात्र, बापट यांच्या भूमिकेला गणेशोत्सव मंडळांच्या काही कार्यकर्त्यांनी विरोध केला. गणेशोत्सवातील पारंपरिक उत्साह, मिरवणुका आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ध्वनीव्यवस्थेचे महत्त्व असल्याची भूमिका कार्यकर्त्यांकडून मांडण्यात आली. डीजेच्या वापराबाबत नियम आणि मर्यादा असल्या तरी गणेशोत्सवातील उत्साहावर गदा आणणारी भूमिका स्वीकारता येणार नाही, अशी भूमिका मंडळ कार्यकर्त्यांनी घेतल्याचे समोर आले. त्यामुळे ध्वनीप्रदूषणाचा प्रश्न आणि गणेशोत्सव मंडळांचा उत्साह यामध्ये समतोल कसा साधायचा, यावरून चर्चा रंगली.

'गणेशोत्सव उत्साहात की ध्वनीप्रदूषणमुक्त? -

गणेशोत्सवात डीजे आणि ध्वनिक्षेपकांच्या मोठ्या आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, लहान मुले तसेच इतर नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा दरवर्षी उपस्थित होतो. दुसरीकडे, गणेशोत्सव मंडळांकडून उत्सवातील पारंपरिक जल्लोष आणि मिरवणुकांमध्ये ध्वनीव्यवस्थेला महत्त्व दिले जाते. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 'डीजेमुक्त गणेशोत्सव' विरुद्ध 'उत्सवाचा जल्लोष' असा वाद पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. विद्यानंद बापट यांनी मांडलेली ध्वनीप्रदूषणमुक्त गणेशोत्सवाची भूमिका आणि त्याला मिळालेला मंडळ कार्यकर्त्यांचा विरोध यामुळे पुण्यातील गणेशोत्सवाच्या नियोजनावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.


Related

पुणे (चेतन झडपे) : गणेशोत्सवाच्या काळात होणारे ध्वनीप्रदूषण आणि डीजेच्या वाढत्या वापराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. डीजेमुक्त आणि ध्वनीप्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा व्हावा, अशी भूमिका पुण्यातील नागरिक विद्यानंद बापट यांनी पुणे महानगरपालिका सभागृहात मांडली. मात्र, बापट यांच्या या भूमिकेला काही गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून विरोध करण्यात आला.

गणेशोत्सव मंडळ कार्यकर्त्यांकडून विरोध -

'गणेशोत्सव उत्साहात की ध्वनीप्रदूषणमुक्त? -

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Political Maharashtra