Pardhi Community Bank Discrimination : पारधी समाजातील काही महिला नियमित बँक खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शाखेत गेले होते.
नागपूर (डोंगरगाव) : नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत पारधी समाजातील नागरिकांना बॅंकेचे खाते उघडताना भेदभावपूर्ण वागणूक दिल्याचा आरोप समोर आला आहे.
नागपूर जिल्ह्यातल्या काटोलमधल्या डोंगरगाव येथे सावित्रिबाई फुले आणि जिजामाता यांच्या नावावर सुरु झालेल्या बचत गटाची महिलांची बॅँक खाती बँकेने अत्यंत बेजबाबदार आणि संतापजनक वर्तन दाखवले आहे. पारधी अस्वच्छ असतात, अनेक आंघोळ करत नाहीत, ते दारुचे व्यवसाय करतात, त्यांचं बँक खाते आमच्या बँकेत नकोच, अशी धक्कादायक भूमिका बॅंकेने घेतल्याचा आरोप बचत गटातील महिलांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पारधी समाजातील काही महिला नियमित बँक खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शाखेत गेले होते. मात्र, त्यांना खाते उघडण्याच्या प्रक्रियेदरम्यान वारंवार अडथळे निर्माण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. आवश्यक कागदपत्रे सादर करूनही खाते उघडण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचे संबंधितांनी सांगितले. पीडित महिलांनी या प्रकाराला सामाजिक भेदभावाचे स्वरूप असल्याचा आरोप केला आहे.
बँकिंगसारख्या मूलभूत आर्थिक सेवांमध्ये कोणत्याही समाज किंवा घटकावर भेदभाव होऊ नये, असं अपेक्षित असताना डोंगरगाव काटोल येथे घडलेला हा प्रकार भारतीय स्वातंत्र्याच्या अमतकाळातही अशा प्रकारमुळे भेदभावाचा भीषण प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्या बॅंक कर्मचारी व अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान काही माध्यम प्रतिनिधी बॅकेत गेल्यानंतचर संबंधित बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला आहे. तसेच बॅंकेने पारधी महिलांकडून केले जाणारे आरोप फेटाळले आहे. मात्र इतकी दिवस बॅंक खाते उघडण्याचं काम प्रलंबित का आहे, याचं समाधानकारक उत्तर बॅंकेचे कर्मचारी देऊ शकले नाहीत. त्यामुळे आता यावर कारवाई करण्याची मागणी संबंधित महिलांकडून होत आहे.
Related
नागपूर (डोंगरगाव) : नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत पारधी समाजातील नागरिकांना बॅंकेचे खाते उघडताना भेदभावपूर्ण वागणूक दिल्याचा आरोप समोर आला आहे. नागपूर जिल्ह्यातल्या काटोलमधल्या डोंगरगाव येथे सावित्रिबाई फुले आणि जिजामाता यांच्या नावावर सुरु झालेल्या बचत गटाची महिलांची बॅँक खाती बँकेने अत्यंत बेजबाबदार आणि संतापजनक वर्तन दाखवले आहे. पारधी अस्वच्छ असतात, अनेक आंघोळ करत नाहीत, ते दारुचे व्यवसाय करतात, त्यांचं बँक खाते आमच्या बँकेत नकोच, अशी धक्कादायक भूमिका बॅंकेने घेतल्याचा आरोप बचत गटातील महिलांनी केला आहे.

