मुंबई : शिवसेनेचे विधानपरिषदेवरील आमदार बच्चू कडू यांच्या एका ताज्या विधानावर महायुतीच राजकीय फटाके फुटले होते. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे राज्याचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत, अशी अपेक्षा आमदार कडू यांनी व्यक्त केली होती.
तर कडू यांच्या या विधानावर राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी महायुतीत सर्व काही ठिक चाललेले असताना, कडूंना असे वक्तव्य करण्याची गरज नव्हती, असे सुनावले. यावर आता कडूंनी पुन्हा एकदा भाष्य़ करत प्रतिक्रिया दिली आहे.
एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना आमदार कडू म्हणाले की, नीतेश राणेंना आमचे बोल कडू लागत असेल तर गोड मानून घ्यावे. दुसरी गोष्ट म्हणजे फडणवीस यांचे प्रमोशनसुद्धा होऊ शकते. जर फडणवीस साहेबांचं प्रमोशन झाल्यानंतर तर महाराष्ट्राला शिंदे साहेबांशिवाय पर्याय आहे का? त्यामुळे मी म्हणालो होतो की, शिंदे साहेब
या राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत.
यामुळे आता देंवेंद्र फडणवीस यांना राजकीय प्रमोशन मिळून ते जर का दिल्लीत जाणार असतील तर राज्यात मुख्यमंत्रीपदासाठी ताकदीचा नेता म्हणून शिवसेनेचे आमदार हे एकनाथ यांच्याकडे आहेत. फडणवीसांनंतर मुख्यमंत्री शिंदे होणार, अशी आशा शिवसेनेच्या नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्री पद दिले तर ते राज्याचे पहिले वहिले महिला मुख्यमंत्री होतील, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही व्यक्त केली जात आहे.
Related
मुंबई : शिवसेनेचे विधानपरिषदेवरील आमदार बच्चू कडू यांच्या एका ताज्या विधानावर महायुतीच राजकीय फटाके फुटले होते. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे राज्याचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत, अशी अपेक्षा आमदार कडू यांनी व्यक्त केली होती. तर कडू यांच्या या विधानावर राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी महायुतीत सर्व काही ठिक चाललेले असताना, कडूंना असे वक्तव्य करण्याची गरज नव्हती, असे सुनावले. यावर आता कडूंनी पुन्हा एकदा भाष्य़ करत प्रतिक्रिया दिली आहे.

