Dailyhunt
राहुरीत उलथापालथ : तनपुरेंची माघार; ठाकरेंचा पठ्ठ्या आता पवारांचा शिलेदार.

राहुरीत उलथापालथ : तनपुरेंची माघार; ठाकरेंचा पठ्ठ्या आता पवारांचा शिलेदार.

हिल्यानगर : राहुरी विधानसभा निवडणुकीत आता मोठा ट्विस्ट आला आहे. शरद पवार गटाचे माजी मंत्री, आमदार प्राजक्त तनपुरे यांची भाजपच्या नेत्यांशी वाढलेली जवळीक शरद पवार पवार गटाचे चिंचेचे कारण ठरले होते.

आता भाजप नेत्यांनी घेतलेल्या भेटीनंतर तनपुरेंनी अपेक्षेनुसार माघार घेतली आहे. या घातपाताची शक्यता लक्षात घेऊनच, शरद पवार गटाकडून ठाकरे गटाचे नेते गोविंद मोकाटे यांना उमेदवारी देऊ केली आहे. त्यामुळे शरद पवार गटात तनपुरे आऊट आणि मोकाटे इन झालेले आहेत.

तनपुरेंच्या माघारीनंतर आता भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले विरुद्ध शरद पवार गटाकडून गोविंद मोकाटे असा सामना रंगणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वेगाने घडामोडी घडून येत आहेत. प्राजक्त तनपुरे यांची भाजपशी वाढलेली जवळीक आणि अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी केल्याची चर्चा होती. यामुळे शरद पवार गटाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दोन एबी फॉर्म देण्याची सावध भूमिका घेतली होती.

चव्हाण - विखेंची भेट :

दरम्यान रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तनपुरेंच्या कार्यालयात भेट घेऊन, कर्डिले यांच्याविरोधाच फाॅर्म भरु नये, यासाठी विनंती केली अशी माहिती आहे. या चर्चेत तनपुरे यांचे बंधू हर्षल तनपुरे देखील सहभागी होते. यामुळे आता या चौघांमध्ये बंद दाराआडा नेमकी काय चर्चा झाली, हे गुलदस्त्यात आहे. मात्र तूर्तास उमेदवारी मागे घेण्याबाबत मनधरणी करण्यात आली आहे.

यावेळी तनपुरे बंधूंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा घडवून दिल्याची माहिती आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या संवादामध्ये काय 'ठरलं' याचा तपशील मात्र बाहेर आला नाही.


Related

अहिल्यानगर : राहुरी विधानसभा निवडणुकीत आता मोठा ट्विस्ट आला आहे. शरद पवार गटाचे माजी मंत्री, आमदार प्राजक्त तनपुरे यांची भाजपच्या नेत्यांशी वाढलेली जवळीक शरद पवार पवार गटाचे चिंचेचे कारण ठरले होते. आता भाजप नेत्यांनी घेतलेल्या भेटीनंतर तनपुरेंनी अपेक्षेनुसार माघार घेतली आहे. या घातपाताची शक्यता लक्षात घेऊनच, शरद पवार गटाकडून ठाकरे गटाचे नेते गोविंद मोकाटे यांना उमेदवारी देऊ केली आहे. त्यामुळे शरद पवार गटात तनपुरे आऊट आणि मोकाटे इन झालेले आहेत.

चव्हाण - विखेंची भेट :

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Political Maharashtra