Ravikant Tupkar News : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सरकारने ठोस निर्णय घ्यावा, यासाठी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा तुपकर यांनी दिला आहे.
मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलन सुरू आहे.
सरकारकडून अद्याप मागण्यांची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत आता तुपकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील मंत्रालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात मंत्र्यांचे शासकीय बंगले आणि शासकीय वाहनांचा प्रतीकात्मक लिलाव करून त्यातून मिळणारा पैसा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरण्याची मागणी केली जाणार आहे.
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांचे प्रोत्साहन द्यावे, 2019 पूर्वी कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ द्यावा, तसेच आयटीआर भरणारे आणि पुनर्गठित कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीच्या कक्षेत आणावे, अशा विविध मागण्या तुपकर यांच्या संघटनेने केल्या आहेत.
'मंत्र्यांचे बंगले-गाड्या विकून शेतकऱ्यांची कर्जमाफी करा' -
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सरकारने ठोस निर्णय घ्यावा, यासाठी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा तुपकर यांनी दिला आहे. याचाच एक भाग म्हणून मंत्रालयासमोर मंत्र्यांचे शासकीय बंगले आणि शासकीय वाहनांचा प्रतीकात्मक लिलाव करण्यात येणार आहे. मंत्र्यांच्या आलिशान शासकीय सुविधांवर होणारा खर्च कमी करून तो पैसा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरावा, असा संदेश या आंदोलनातून सरकारला देण्यात येणार आहे.
कर्जमाफीच्या मागणीवर तुपकर आक्रमक -
राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासोबतच विविध कारणांमुळे कर्जमाफीच्या योजनांपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळावा, अशी मागणी करण्यात येत आहे. विशेषतः 2019 पूर्वीचे वंचित शेतकरी, आयटीआर भरणारे शेतकरी आणि पुनर्गठित कर्ज असलेले शेतकरी यांनाही कर्जमाफीच्या कक्षेत आणण्याची मागणी तुपकर यांच्या संघटनेने केली आहे.
सरकारच्या भूमिकेकडे लक्ष -
या मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन करूनही सरकारकडून अपेक्षित दखल घेतली जात नसल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आता मंत्रालयासमोर आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सरकार काय भूमिका घेते आणि मंत्रालयासमोरील आंदोलनानंतर कर्जमाफीबाबत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे आता शेतकरी आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Related
मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलन सुरू आहे. सरकारकडून अद्याप मागण्यांची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत आता तुपकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील मंत्रालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात मंत्र्यांचे शासकीय बंगले आणि शासकीय वाहनांचा प्रतीकात्मक लिलाव करून त्यातून मिळणारा पैसा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरण्याची मागणी केली जाणार आहे.
'मंत्र्यांचे बंगले-गाड्या विकून शेतकऱ्यांची कर्जमाफी करा' -
कर्जमाफीच्या मागणीवर तुपकर आक्रमक -
सरकारच्या भूमिकेकडे लक्ष -

