Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Santosh Pandit FIR : मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी शिवीगाळ केल्याने 'रिलस्टार' संतोष पंडितवर गुन्हा दाखल!

Santosh Pandit FIR : मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी शिवीगाळ केल्याने 'रिलस्टार' संतोष पंडितवर गुन्हा दाखल!

Santosh Pandit FIR : या चित्रफितीत अश्लील आणि शिवराळ भाषेचा वापर संतोष पंडित यांनी केला होता. तसेच चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य

पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणारी चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

यापैकी समाज माध्यमावर सक्रिय असलेले संतोष पंडित यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सुनील पांडे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'राजकारण एक्सप्रेस' या समाजमाध्यमावरील खात्यावरून चंद्रकांत पाटील यांच्याविषयी संतोष पंडित यांनी आक्षेपार्ह वक्तव्य असलेली चित्रफीत नुकतीच प्रसारित करण्यात आली. 'जनतेच्या प्रश्नांची उत्तरे नेते देत नाहीत. पाटील हे त्यापैकी एक आहेत', अशा आशयाचा मजकूर या चित्रफितीसोबत प्रसारित
करण्यात आला होता.

या चित्रफितीत अश्लील आणि शिवराळ भाषेचा वापर संतोष पंडित यांनी केला होता. तसेच चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर भाजप नगरसेवक
सुनील पांडे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

फिर्यादीत, संबंधित चित्रफितीमध्ये अश्लील आणि शिवराळ भाषा वापरून चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे डेक्कन पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलीस निरीक्षक जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत.


Related

पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणारी चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापैकी समाज माध्यमावर सक्रिय असलेले संतोष पंडित यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सुनील पांडे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Political Maharashtra