Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Shahjahanpur Councillors : 'भ्रष्टाचारातला पैसा मिळून-मिसळून खायचा'; भाजपची सत्ता असलेल्या पालिकेत नगरसेवकांचा खळबळजनक व्हिडिओ!

Shahjahanpur Councillors : 'भ्रष्टाचारातला पैसा मिळून-मिसळून खायचा'; भाजपची सत्ता असलेल्या पालिकेत नगरसेवकांचा खळबळजनक व्हिडिओ!

Shahjahanpur Councillors : नगरपालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि आर्थिक अनियमितता असल्याचा आरोप करत काँग्रेसने या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.

शाहजहांपूर : उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील नगरसेवकांचा एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ते भ्रष्ट्राचारातून उत्पन्न आणि कमिशन आपापसात समान वाटून घेण्याची शपथ घेताना दिसत आहेत.

या प्रकारामुळे स्थानिक पातळीवर राजकीय खळबळ उडाली आहे. नगरपालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि आर्थिक अनियमितता असल्याचा आरोप करत काँग्रेसने या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, नगर आयुक्त सौम्या गुरू राणी यांनी सांगितले की, हा व्हिडिओ जुना असल्याचे दिसून येत आहे आणि त्यांनी या प्रकरणाची तपासणी करण्याचे आश्वासन दिले आहे.

या व्हिडिओमध्ये शाहजहांपूर नगरपालिकेचे काही नगरसेवक हातात गंगेचे पाणी घेऊन सामूहिक शपथ घेताना दिसत आहेत. या व्हिडिओबाबतच्या दाव्यांनुसार, नगरसेवक नगरपालिकेच्या कामकाजातून मिळणारे कोणतेही बेकायदेशीर उत्पन्न किंवा कमिशन आपापसात वाटून घेण्याचे वचन देत आहेत. एखाद्या सदस्यावर संकट ओढवल्यास सर्वजण एकत्र राहतील आणि एकमेकांच्या विरोधात जाणार नाहीत, असे नगरसेवक म्हणताना ऐकू येतात.

"आम्ही पवित्र गंगेच्या पाण्याची शपथ घेतो की, नगरपालिकेद्वारे मिळणारे कोणतेही बेकायदेशीर उत्पन्न आणि कमिशन आमच्या सर्वांमध्ये समान रीतीने वाटले जाईल. आणि जर आमच्यापैकी कोणावर किंवा आमच्या गटातील कोणावरही काही संकट आले, तर आम्ही सर्वजण एकत्र उभे राहू. जर कोणी पाठ फिरवली, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल," असे नगरसेवक म्हणताना ऐकू येतात. या व्हिडिओवर काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया दिली असून आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रजनीश गुप्ता यांनी नगरपालिकेत भ्रष्टाचार बोकाळल्याचा आरोप केला आणि म्हटले की, हा व्हिडिओ मोठ्या आर्थिक गैरव्यवहार घोटाळा बाहेर काढू शकतो.

गुप्ता यांनी कथित अनियमिततेच्या प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि त्याचा फायदा कोणाला होत होता, याबद्दल स्पष्टीकरण मागितले. तसेच, कथित बेकायदेशीर वसुलीची रक्कम नगरसेवकांमध्ये वाटली जात होती का आणि कोणाला मोठा वाटा मिळत होता, यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. नगर आयुक्त सौम्या गुरू राणी यांनी आश्वासन दिले की, या प्रकरणावर जिल्हा दंडाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल आणि व्हिडिओशी संबंधित तथ्ये जाणून घेण्यासाठी चौकशी सुरू केली जाईल.


Related

शाहजहांपूर : उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील नगरसेवकांचा एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ते भ्रष्ट्राचारातून उत्पन्न आणि कमिशन आपापसात समान वाटून घेण्याची शपथ घेताना दिसत आहेत. या प्रकारामुळे स्थानिक पातळीवर राजकीय खळबळ उडाली आहे. नगरपालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि आर्थिक अनियमितता असल्याचा आरोप करत काँग्रेसने या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, नगर आयुक्त सौम्या गुरू राणी यांनी सांगितले की, हा व्हिडिओ जुना असल्याचे दिसून येत आहे आणि त्यांनी या प्रकरणाची तपासणी करण्याचे आश्वासन दिले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Political Maharashtra