Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'शेतकरी-दिव्यांगासाठी धनुष्यबाण हाती घेतला'; बच्चू कडू अर्ज भरणार!

'शेतकरी-दिव्यांगासाठी धनुष्यबाण हाती घेतला'; बच्चू कडू अर्ज भरणार!

मुंबई : प्रहार क्रांती संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी रात्री उशीरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली होती. शिवसेनेकडून कडू यांचं नाव विधानपरिषद उमेदवारीसाठी जवळपास निश्चित झाले आहे.

विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत, त्यामुळे शिंदे आणि कडू यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चा घडून येत आहेत. यावर आता कडू यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतल्याचे जाहीर केले आहे.

आज नंदनवन या बंगल्यावर पोहचण्याआधी कडू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कडू म्हणाले,
"शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार आहे. आमचे सर्व मुद्दे शिवसेनेने स्वीकारले आहे. आमचे मुद्दे मान्य झाल्यानंतरच हा निर्णय घेतला आहे. शिवसेना राजकीय ताकद वाढवण्यामध्ये प्रामाणिकपणे काम करणार आहे. त्याच्या बदल्यात आम्हाला शेतकऱ्याची ताकद, दिव्यांगांची ताकद हवे आहे. प्रहार सामादिक आणि दिव्यांग संघटना कायम राहणार आहे. राजकीय प्रवास शिवसेनेकडून सुरुवात केली होती. मागे शेतकऱ्यांच्याच मुद्द्यावरुन शिवसेनेचा राजीनामा दिली होता, आता शेतकऱ्यांचाच मुद्दा घेऊन शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे.

मंत्रीपद मागण्याची सवय नाही?

मंत्री पद मागण्याची माझी सवय नाही. मंत्री व्हायचंच असतं तर गुहाहाटीला गेल्यावरच मागितली असती. आम्ही दिव्यांग मंत्रालया तयार व्हावं,यासाठी भांडत बसलो. हाच फरक बच्चू कडूंमध्ये आहे, असे कडू म्हणाले.

गुवाहाटी वाल्यांना का छेडता?

"तुम्ही का छेडचा गुवाहाटीवाल्यांना? सगळे गुवाहाटीवाले निवडून आले की नाही आले? मग तुम्ही का बोंबलून राहिले? लोकांनीपटापटा मतं मारली गुवाहाटीवाल्यांना, लोकांनी स्वीकारलं पण, तुमचा प्रश्न कायमच आहे," असेही कडू म्हणाले.

Related

मुंबई : प्रहार क्रांती संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी रात्री उशीरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली होती. शिवसेनेकडून कडू यांचं नाव विधानपरिषद उमेदवारीसाठी जवळपास निश्चित झाले आहे. विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत, त्यामुळे शिंदे आणि कडू यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चा घडून येत आहेत. यावर आता कडू यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतल्याचे जाहीर केले आहे.

मंत्रीपद मागण्याची सवय नाही?

गुवाहाटी वाल्यांना का छेडता?

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Political Maharashtra