मुंबई (चेतन झडपे) : प्रहार क्रांती संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी रात्री उशीरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे. शिवसेनेकडून कडू यांचं नाव विधानपरिषद उमेदवारीसाठी जवळपास निश्चित झाले आहे.
विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत, त्यामुळे शिंदे आणि कडू यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चा घडून येत आहेत.
बच्चू कडू यांच्या अटी मान्य करुन शिंदे त्यांना विधानपरिषदेवर पाठवणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काल शिवसेनेच्या सर्व नेत्यांची बैठक झाल्याचीही माहिती आहे. यानंतर बच्चू कडू आणि एकनाथ शिंदे यांची जवळपास पाऊणतास चर्चा झाली आहे. आज पुन्हा बच्चू कडू यांना बोलवण्यात आले आहे. त्यामुळे कडू यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे.
बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश करून, त्यांना शिवसेनेच्या वतीने विधानपरिषदेवर पाठवण्यात येईळ अशी माहिती आहे. काल कडू यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन याविषयी संकेत दिले होते. यानंतर शिवसेनेच्या एका बड्या नेत्याने कडू यांची भेट घेतली होती. त्यांच्या अटी - शर्थी काय आहेत, याबाबत विचारपूस केली होती.
यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास उरले असताना, कडू यांचीच विधानसेभेवर वर्णी लागणार असल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांचही नाव विधानपरिषदेसाठी निश्चित मानलं जात आहे. शिवसेनेत दोन जागांसाठी अनेक जण इच्छुक होते, मात्र आता ही दोन नावे निश्चित झाल्याचे जवळपास ठरले आहे.
यावर बच्चू कडू काय म्हणाले?
"मला शिवसेनेकडून फोन आलेला आहे. मी दहा वाजता पोहचणार आहे. मात्र अजून काही निश्चित झालेलं मला समजत नाही. आम्ही अर्ज शिवसेनेतून भरु, मात्र प्रहार संघटना कायम ठेवू. मी जर शिवसेनेतून अर्ज भरला तर प्रहार एक सामाजिक संघटना म्हणून काम करणार आहे, " अस कडू यांनी स्पष्ट केले आहे.
Related
मुंबई (चेतन झडपे) : प्रहार क्रांती संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी रात्री उशीरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे. शिवसेनेकडून कडू यांचं नाव विधानपरिषद उमेदवारीसाठी जवळपास निश्चित झाले आहे. विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत, त्यामुळे शिंदे आणि कडू यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चा घडून येत आहेत.
यावर बच्चू कडू काय म्हणाले?

