नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सुरु असलेला अंतर्गत सत्तासंघर्ष आता जाहीरपणे चव्हाट्यावर येताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवारांकडून १० मार्च रोजी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या एका पत्राची आज सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.
या पत्रामध्ये पक्षाचे महत्त्वाचे नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावापुढील पदनामे जाणीवपूर्वक वगळले गेल्याची चर्चा आहे. तर आपल्या पदानामांना डावलल्यामुळे आता राष्ट्रवादीतील गटबाजी उफाळून येण्याची दाट शक्यता आहे. या गटबाजीची वादातूनच आजच्या सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्याकडे पटेल आणि तटकरेंनी पाठ फिरवल्याचे दिसून आले.
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आज राजधानी दिल्ली दौऱ्यावर आहेत. मात्र पवारांच्या या महत्त्वपूर्ण दौऱ्यामध्ये पक्षाचेच दोन मोठे नेते खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरेयांची अनुपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पवारांच्या दिल्ली दौऱ्याकडे पटेल - तटकरेंनी पाठ फिरवल्याने त्यांच्या नाराजीची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
सर्वसाधरणपणे अजित पवार किंवा आता सुनेत्रा पवार यांचा कोणताही देशपातळीवरच्या दौऱ्यात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे उपस्थित असणे, हा पक्षाचा एक नियमच बनून गेला होता. दोन्ही नेते संसदेचे सदस्य असल्यामुळे दिल्लीच्या राजकीय वलयात या दोन्ही नेत्यांचा वावर असायचा. मात्र नाराजीतून आणि पक्षांतर्गत वादातून त्यांनी पाठ फिरवली असल्याचे बोलले जात आहे.
पटेल -तटकरेंची ही नाराजी आणि आपल्या सर्वोच्च नेत्याच्या दौऱ्याकडे फिरवलेली पाठ हा निव्वळ योगायोग असावा की, ही पक्षांतर्गत धुसफुसीचे आणि अंतर्गत वादविवादाचे टोक आहे, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. मात्र मात्र पक्षाचे रणनीतीकार नरेश अरोरा यांची हकालपट्टी आणि पटेल - तटकरेंना दाखवलेली जागा पक्षात नव्या संघर्षाचे कारण बननणार का? याबाबत आता प्रश्न निर्माण होत आहेत. यामुळे पक्षात नवी बंडाळी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहेत.
Related
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सुरु असलेला अंतर्गत सत्तासंघर्ष आता जाहीरपणे चव्हाट्यावर येताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवारांकडून १० मार्च रोजी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या एका पत्राची आज सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. या पत्रामध्ये पक्षाचे महत्त्वाचे नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावापुढील पदनामे जाणीवपूर्वक वगळले गेल्याची चर्चा आहे. तर आपल्या पदानामांना डावलल्यामुळे आता राष्ट्रवादीतील गटबाजी उफाळून येण्याची दाट शक्यता आहे. या गटबाजीची वादातूनच आजच्या सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्याकडे पटेल आणि तटकरेंनी पाठ फिरवल्याचे दिसून आले.

