Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारीक दिवाळखोरी दाखवली; सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडीया' म्हंटल्याने तटकरे दुखावले!

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारीक दिवाळखोरी दाखवली; सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडीया' म्हंटल्याने तटकरे दुखावले!

Maharashtra Politics : काँग्रेसचं अशा प्रकारचं वक्तव्य हे त्यांच्या वैचारीक दिवाळखोरीचं लक्षण आहे. राजकीय मतभेद असू शकतात, परंतु वैयक्तिक पातळीवर किंवा महिलांचा अवमान करणारी भाषा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसच्या ट्विटमध्ये कथित 'गुंगी गुडिया' या टिप्पणीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांनी उडी घेत काँग्रेसच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत टीका केली आहे.

सुनिल तटकरे यांनी या काँग्रेसचा निषेध करत, सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या महिला नेत्यांविषयी अशा प्रकारची भाषा वापरणे अयोग्य असल्याचे म्हटले. काँग्रेसचं अशा प्रकारचं वक्तव्य हे त्यांच्या वैचारीक दिवाळखोरीचं लक्षण आहे. राजकीय मतभेद असू शकतात, परंतु वैयक्तिक पातळीवर किंवा महिलांचा अवमान करणारी भाषा कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तटकरे म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभेल अशी भाषा आणि परस्परांबद्दल आदराची भूमिका सर्व पक्षांनी ठेवली पाहिजे. महिलांचा सन्मान राखणे ही प्रत्येक पक्षाची जबाबदारी असून, राजकीय टीकेची पातळी घसरू नये, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना असून, राज्यातील विविध ठिकाणी काँग्रेसविरोधात आंदोलन करण्यात आले. काही ठिकाणी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली तसेच संबंधित पदाधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

दुसरीकडे, काँग्रेसकडून या वादावर अद्याप अधिकृत स्पष्टीकरण समोर आले नसले, तरी या वक्तव्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेत्यांमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक संघर्ष रंगला आहे. सुनेत्रा पवार यांच्यावरील या टिप्पणीमुळे महिला सन्मान, राजकीय भाषेची मर्यादा आणि सार्वजनिक जीवनातील सभ्यतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. येत्या काही दिवसांत या प्रकरणावर काँग्रेसची अधिकृत भूमिका काय असते आणि राजकीय वर्तुळात याचे पडसाद किती उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Related

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Political Maharashtra