Dailyhunt
तनपुरेंच्या कार्यालयात विखेंचा नाश्ता, थेट मुख्यमंत्र्यांना फोन; राहुरीत ट्विस्ट!

तनपुरेंच्या कार्यालयात विखेंचा नाश्ता, थेट मुख्यमंत्र्यांना फोन; राहुरीत ट्विस्ट!

हिल्यानगर : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वेगाने घडामोडी घडून येत आहेत. एकिकडे भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले हे आपला उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत असताना, दुसरीकडे अपक्ष म्हणून इच्छुक असणारे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांची भाजप महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेतली.

यामुळे पुढील काही तासांत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

चव्हाण आणि विखे पाटील यांनी तनपुरेंच्या कार्यालयात भेट घेऊन, कर्डिले यांच्याविरोधाच फाॅर्म भरु नये, यासाठी विनंती केली अशी माहिती आहे. या चर्चेत तनपुरे यांचे बंधू हर्षल तनपुरे देखील सहभागी होते. यामुळे आता या चौघांमध्ये बंद दाराआडा नेमकी काय चर्चा झाली, हे गुलदस्त्यात आहे. मात्र तूर्तास उमेदवारी मागे घेण्याबाबत मनधरणी करण्यात आली आहे. यावेळी तनपुरे बंधूंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा घडवून दिल्याची माहिती आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या संवादामध्ये काय 'ठरलं' याचा तपशील बाहेर आला नाही.

भेटीनंतर तनपुरेंची प्रतिक्रिया -

"मागील दोन दशकात आम्हाला खूप अल्प काळ प्रतिनिधित्व मिळालं आहे. त्यामुळे, जनता, कार्यकर्ते ऐकायला तयार नाही. निवडणूक लढवावी, अशी सर्वांची इच्छा आहे. मात्र अंतिमत: निर्णय
राहुरीतील कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर निवडणूक लढवायची की नाही, याबाबत निर्णय घेणार आहे," असे प्राजक्त तनपुरे म्हणाले.


Related

अहिल्यानगर : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वेगाने घडामोडी घडून येत आहेत. एकिकडे भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले हे आपला उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत असताना, दुसरीकडे अपक्ष म्हणून इच्छुक असणारे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांची भाजप महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेतली. यामुळे पुढील काही तासांत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

भेटीनंतर तनपुरेंची प्रतिक्रिया -

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Political Maharashtra