अहिल्यानगर : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वेगाने घडामोडी घडून येत आहेत. भाजपने दिवंगत नेते शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिल यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी भाजपची उमेदवारी मिळाली आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील महत्त्वाचा पक्ष शरद पवार गटाकडून अजूनही काही निश्चित होत नाही.
शरद पवार गटाचे नेते, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची भाजपशी वाढलेली जवळीक आणि अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी केल्याची चर्चा आहे. यामुळे शरद पवार गटाने सावध भूमिका घेतली आहे.
शरद पवार गटाने दोन उमेदवारांच्या नावाने ए बी फाॅर्म दिला आहे. प्राजक्त तनपुरे आणि गोविंद मोकाट या दोघांनाही ए बी फाॅर्म दिला आहे. तनपुरे यांची भाजपशी वाढलेली जवळीकतेमुळे, ऐनवेळी घातपाताच्या शक्यतेतून शरद पवार गटाने अशी राजकीय खेळी खेळली आहे. यामुळे आता पक्षाचाच तनपुरेंवर विश्वास नसल्याचा संदेश पक्षात गेला आहे.
दरम्यान रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तनपुरेंच्या कार्यालयात भेट घेऊन, कर्डिले यांच्याविरोधाच फाॅर्म भरु नये, यासाठी विनंती केली अशी माहिती आहे. या चर्चेत तनपुरे यांचे बंधू हर्षल तनपुरे देखील
सहभागी होते. यामुळे आता या चौघांमध्ये बंद दाराआडा नेमकी काय चर्चा झाली, हे गुलदस्त्यात आहे.
मात्र तूर्तास उमेदवारी मागे घेण्याबाबत मनधरणी करण्यात आली आहे. यावेळी तनपुरे बंधूंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा घडवून दिल्याची माहिती आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या संवादामध्ये काय 'ठरलं' याचा तपशील मात्र बाहेर आला नाही.
Related
अहिल्यानगर : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वेगाने घडामोडी घडून येत आहेत. भाजपने दिवंगत नेते शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिल यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी भाजपची उमेदवारी मिळाली आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील महत्त्वाचा पक्ष शरद पवार गटाकडून अजूनही काही निश्चित होत नाही. शरद पवार गटाचे नेते, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची भाजपशी वाढलेली जवळीक आणि अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी केल्याची चर्चा आहे. यामुळे शरद पवार गटाने सावध भूमिका घेतली आहे.

