Tukaram Munde News : राजकीय नेत्यांकडे मोठा डिजिटल बेस असला, तरी तुकाराम मुंढेंच्या पोस्टवर दिसणारा एंगेजमेंट रेट त्यांचा प्रभाव वेगळ्या पातळीवर असल्याचं दाखवतो.
मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभाग आयुक्त तुकाराम मुंढेंनी चक्क महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा लोकप्रियतेत मागे टाकलेल पाहायला मिळते.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक वेगळीच गोष्ट पाहायला मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि दिग्गज सनदी अधिकाऱ्यांची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोइंग असताना, तुकाराम मुंढे यांनी या सगळ्यांनाच लोकप्रियतेच्या एका बाबतीत मागे टाकलंय. विशेष म्हणजे मुंढे हे सोशल मीडियावर फारसे पोस्टही करत नाही, तरीही त्याच्या प्रत्येक पोस्टवर लोकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतोय.
महाराष्ट्राच्या प्रशासनात आपल्या कडक शिस्तीसाठी आणि धडाडीच्या कामासाठी ओळखले जाणारे तुकाराम मुंढे आता सोशल मीडियावरही तितकेच लोकप्रिय ठरत आहेत. इन्स्टाग्राम असो किंवा 'X' म्हणजेच ट्विटर, फॉलोअर्सपेक्षा त्यांच्या पोस्टवर मिळणारा प्रत्यक्ष प्रतिसाद लक्ष वेधून घेतोय. विशेष म्हणजे कमी पोस्ट करूनही मुंढेंच्या पोस्टवर मोठ्या प्रमाणात एंगेजमेंट पाहायला मिळत आहे. इन्स्टाग्रामवरील आकडेवारी पाहिली तर तुकाराम मुंढेंचे तब्बल ३४ लाख १५ हजार फॉलोअर्स आहेत. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे २९ लाख २ हजार, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे १३ लाख १ हजार फॉलोअर्स आहेत. म्हणजेच फॉलोअर्सच्या बाबतीतही मुंढे दोन्ही नेत्यांपेक्षा पुढे आहेत. पण खरी चर्चा फॉलोअर्सची नाही, तर एंगेजमेंट रेटची आहे.
गेल्या ६० दिवसांत तुकाराम मुंढेंनी फक्त १३ पोस्ट केल्या, तर देवेंद्र फडणवीस यांनी ९७ आणि एकनाथ शिंदे यांनी २५ पोस्ट केल्या. तरीही मुंढेंचा एंगेजमेंट रेट तब्बल २०.३५ टक्के आहे. याच तुलनेत फडणवीसांचा ०.५० टक्के, तर एकनाथ शिंदेंचा फक्त ०.२४ टक्के एंगेजमेंट रेट आहे. म्हणजेच मुंढेंची पोस्ट कमी… पण लोकांचा प्रतिसाद मोठा! आणि हीच गोष्ट त्यांच्या सोशल मीडिया प्रभावाची ताकद दाखवते. फक्त इन्स्टाग्रामवरच नाही, तर 'X' वरही हेच चित्र दिसतं. इथे देवेंद्र फडणवीस यांचे ५.०२ लाख आणि एकनाथ शिंदे यांचे ३.८७ लाख फॉलोअर्स आहेत, तर तुकाराम मुंढेंचे २.६५ लाख फॉलोअर्स आहेत. फॉलोअर्समध्ये मुंढे मागे असले तरी एंगेजमेंट रेटमध्ये ते पुन्हा आघाडीवर आहेत.
मुंढेंचा एंगेजमेंट रेट ४.६२ टक्के, फडणवीसांचा ०.०७ टक्के आणि एकनाथ शिंदेंचा ०.०४ टक्के आहे. इतकंच नाही, तर इतर लोकप्रिय सनदी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या तुलनेतही तुकाराम मुंढे अव्वल दिसतात. इन्स्टाग्रामवर मुंढेंचे ३४.१५ लाख फॉलोअर्स आहेत, तर समीर वानखेडेंचे ८.४७ लाख आणि विश्वास नांगरे पाटील यांचे ६.१२ लाख फॉलोअर्स आहेत. एंगेजमेंट रेटमध्येही मुंढे २०.३५ टक्क्यांसह पुढे असून विश्वास नांगरे पाटील ३.६० टक्के आणि समीर वानखेडे ३.२० टक्क्यांवर आहेत.
यावरून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते सोशल मीडियावर फॉलोअर्स किती आहेत, यापेक्षा त्या फॉलोअर्सचा तुमच्या कंटेंटला प्रत्यक्ष प्रतिसाद किती मिळतो, हे आता अधिक महत्त्वाचं ठरतंय. राजकीय नेत्यांकडे मोठा डिजिटल बेस असला, तरी तुकाराम मुंढेंच्या पोस्टवर दिसणारा एंगेजमेंट रेट त्यांचा प्रभाव वेगळ्या पातळीवर असल्याचं दाखवतो.आज सोशल मीडिया हा केवळ मनोरंजनाचा प्लॅटफॉर्म राहिलेला नाही. प्रशासन आणि नागरिकांमधला संवादही मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर होत आहे. त्यामुळे एखादा अधिकारी किती प्रसिद्ध आहे, यापेक्षा त्याच्या कामाबद्दल आणि विचारांबद्दल लोक किती प्रतिक्रिया देतात, हेही महत्त्वाचं ठरतं. म्हणूनच तुकाराम मुंढे आता फक्त कडक अधिकारी म्हणूनच नाही, तर सोशल मीडियावरचा एक मोठा 'डिजिटल ब्रँड' म्हणूनही चर्चेत आले आहेत.
Related
मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभाग आयुक्त तुकाराम मुंढेंनी चक्क महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा लोकप्रियतेत मागे टाकलेल पाहायला मिळते. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक वेगळीच गोष्ट पाहायला मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि दिग्गज सनदी अधिकाऱ्यांची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोइंग असताना, तुकाराम मुंढे यांनी या सगळ्यांनाच लोकप्रियतेच्या एका बाबतीत मागे टाकलंय. विशेष म्हणजे मुंढे हे सोशल मीडियावर फारसे पोस्टही करत नाही, तरीही त्याच्या प्रत्येक पोस्टवर लोकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतोय.

