पुणे : बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार पार्थ पवार आणि काँग्रेसमध्ये वादविवाद आणि टिका टिपण्णीने टोक गाठले आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, या साठी अजित पवार गटाचे नेत्यांची इच्छा होती.
मात्र काँग्रेसने आपला उमेदवार उभा केल्याने पार्थ पवार यांनी काँग्रेसवर कठोर शब्दात टिका केली. "काँग्रेसला भविष्यात फार त्रास होईल, हा काँग्रेसचा डाऊनफॉल आहे," अशा शब्दात पार्थ पवारांनी काँग्रेसला लक्ष्य केले होते. यावार आता काँग्रेसकडून जोरदार पलटवार करण्यात आला आह. काँग्रेसच्या
अधिकृत ट्विटर (एक्स) हँडलवरुन पार्थ पवारांवर तितकीच तिखट आणि बोचरी प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
काँग्रेसने दिवंगत अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनाची आठवण करुन देत, पार्थ पवारांना (Parth Pawar) फटकारले आहे. काँग्रेस (Congress) ट्विट करत म्हणत आहे की, "धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने कॉंग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं,
म्हणजे जरा जास्तच नाही का झालं ?"
अजित पवारांच्या अपघाती निधनाचा उल्लेख :
"स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या, महाशक्तिसमोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलाने कॉंग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील," अशी आठवणही काँग्रेसने पार्थ पवारांना करुन दिली.
वडिलांना काँग्रेसने दिला न्याय :
"या मुलाच्या (पार्थ पवारांच्या) वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकार ने त्यांच्या राज्यात तक्रार (FIR) नोंद करून घेतला, तिथे सरकार काँग्रेस पक्षाचे आहे, कॉंग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणूकीतून माघार घेईल, अशी मागणी करत आहेत. यावरही या कृतघ्न मुलाने बोलायला हवे ? अशा अतिशय कठोर शब्दात काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले!
Related
पुणे : बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार पार्थ पवार आणि काँग्रेसमध्ये वादविवाद आणि टिका टिपण्णीने टोक गाठले आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, या साठी अजित पवार गटाचे नेत्यांची इच्छा होती. मात्र काँग्रेसने आपला उमेदवार उभा केल्याने पार्थ पवार यांनी काँग्रेसवर कठोर शब्दात टिका केली. "काँग्रेसला भविष्यात फार त्रास होईल, हा काँग्रेसचा डाऊनफॉल आहे," अशा शब्दात पार्थ पवारांनी काँग्रेसला लक्ष्य केले होते. यावार आता काँग्रेसकडून जोरदार पलटवार करण्यात आला आह. काँग्रेसच्या
अधिकृत ट्विटर (एक्स) हँडलवरुन पार्थ पवारांवर तितकीच तिखट आणि बोचरी प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
अजित पवारांच्या अपघाती निधनाचा उल्लेख :
वडिलांना काँग्रेसने दिला न्याय :

