Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
विधानपरिषदेच्या निवडणुकीत मानकरांची उडी; उमेदवारीचा ठोकला दावा!

विधानपरिषदेच्या निवडणुकीत मानकरांची उडी; उमेदवारीचा ठोकला दावा!

पुणे : विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रतिनिधित्वातून १६ जागांवर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या १६ जागांपैकी २ जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवण्यास इच्छुक आहे.

रायगड-रत्नागिरी आणि पुण्याची जागा लढवण्यास राष्ट्रवादीचा आग्रह आहे. पुण्यातून माजी आमदार सुनिल टिंगरे, विक्रम काकडे, माजी आमदार रमेश आप्पा थोरात, माजी आमदार विलास लांडे आणि नाना काटे हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र आता पुण्याचे राष्ट्रवादीचे नेते दिपक मानकर यांनीही पुण्याच्या जागेवर तावातावाने आपला दावा मांडला आहे.

पॉलिटिकल महाराष्ट्रशी संवाद साधताना मानकर म्हणाले, "उमेदवारी मागण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे. परंतु माझी भाजपच्या नेतेमंडळींना विनंती राहिल, महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्व निवडणुकांमध्ये प्रामाणिकपणे काम केलं आहे, तर महायुती म्हणून भाजपनं आता प्रेमाने ही जागा आम्हाला सोडली पाहिजे आणि राष्ट्रवादीला मदत केली पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि ते मदत करतील, अशी अपेक्षा आहे."

पक्षपातळीवर निर्णय होईल -

'आदरणीय आमच्या नेत्या सुनेत्रा वहिणी या निश्चितच याबाबत संपूर्ण प्रकियेत त्या सहभाग घेतील, ही जागा राष्ट्रवादीला मिळावी, यासाठी ते निश्चितच प्रयत्न करतील. पार्थदादा देखील याबाबत योग्य ते निर्णय घेतील. ' मी निश्चितपणे ही जागा लढवण्यासाठी इच्छुक आहे. कारण मी पक्षासाठी प्रामाणिकपण काम केलं आहे. ज्यावेळी पक्षाच्या शहराध्यक्षपदाची
धुरा मिळाली. मला विश्वास आहे की, या माध्यमातून मी आणखी चांगलं काम पुणे शहरासाठी करण्ाची संधी मिळणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात कार्यकर्त्यांशी माझा संपर्क आहे. दादांचा विचार घेऊन चालणारा मी कार्यकर्ता आहे. संधीचं सोनं नक्कीच मी करु शकेन.

पक्षाने उमेदवारीबाबत ठरवावं -

"पक्षाने ज्यांना संधी या आधी दिली, त्यांना आता संधी दिली नाही पाहिजे. कार्यकर्त्यांची नाराजी खूप मोठ्या प्रमाणावर होत असते. कार्यकर्त्यांची नाराजी हा खूप मोठा फॅक्टक असतो. पक्षाच्या कार्यकर्त्यांला संधी मिळाली पाहिजे. परंतु तो पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता असणं, आवश्यक आहे. आता पक्षानं ठरवावं की, मला संधी द्यावं की नाही? परंतु या जागेवर मी निश्चुतच इच्छुक आहे.

Related

पुणे : विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रतिनिधित्वातून १६ जागांवर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या १६ जागांपैकी २ जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवण्यास इच्छुक आहे. रायगड-रत्नागिरी आणि पुण्याची जागा लढवण्यास राष्ट्रवादीचा आग्रह आहे. पुण्यातून माजी आमदार सुनिल टिंगरे, विक्रम काकडे, माजी आमदार रमेश आप्पा थोरात, माजी आमदार विलास लांडे आणि नाना काटे हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र आता पुण्याचे राष्ट्रवादीचे नेते दिपक मानकर यांनीही पुण्याच्या जागेवर तावातावाने आपला दावा मांडला आहे.

पक्षपातळीवर निर्णय होईल -

पक्षाने उमेदवारीबाबत ठरवावं -

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Political Maharashtra