अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्याच्या कोपरगाव तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते विवेक कोल्हे यांची नुकतीच विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवड झाली. यानंतर मात्र अहिल्यानगर जिल्ह्यात कोल्हे आणि विखे यांच्यात पूर्वापार चालत आलेली राजकीय संघर्षाची चुणूक दिसून आली.
आता कोल्हे विखे यांच्या राजकीय संघर्षाचा नवा अंक सुरु होण्याची चिन्हे दिसत आहेत. याचा प्रत्यय नवनिर्वाचित विधानपरिषदेवरील आमदार विवेक कोल्हे यांच्या ताज्या वक्तव्यातून आले आहे.
राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं मोठं प्रस्थ असलेल्या राहता तालुक्यातच आमदार कोल्हे यांचा भव्य नागरी सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोल्हे यांनी विखे पाटलांना लक्ष्य करत, जोरदार इशारा दिला.
कोल्हे म्हणाले, "दरम्यानच्या काळात अनेक वेळा क्रॉस फायरींग झाली. अनेक टीका टिपण्णी झाली. परंतु मी आज फारसं टीकात्मक बोलू इच्छित नाही. खरंतर आपल्या गणेश परिसर विरोधी लोकांना मी सांगतोय, आपल्याच परिसरातली ही कामधेनू आहे. दोन तीन वर्षांनी पुन्हा निवडणुका येणार आहेत. तुम्ही रितसर लोकशाही मार्गाने सभासदांपर्यंत जा. तुमचे मत मांडा आणि रितसार निवडणुकांना सामोरे जा. परंतु असा पद्धतीन अडथळे आणून, शेतकऱ्यांची कामधेनू अडचणीत आणू नका."
जब भी घायल होता हॅूं, तब मै घातक होतै हॅूँ -
विरोधकांनी नाहीच ऐकलं. तर माझ्या मूळ स्वभावाप्रमाणे कितीही संयम ठेवायचा प्रयत्न केला. तरी संयमाला कुठेतरी मर्यादा असते. कुणाच्या स्वार्थासाठी नाही. आमचं काही कोणाशी बांधावरुन भांडण नाही. परंतु संस्थेसाठी रस्त्यावर उतरायची वेळ आली तर, तुमच्या बरोबर मी रस्त्यावर उतरेन. अशा प्रवृत्तीविरोधात लढण्याचं काम मी करेन. विरोधक जर एकले नाहीत तर एवढंच सांगतो, जब भी घायल होता हॅूं, तब मै घातक होतै हॅूँ, त्यांनी हे लक्षात ठेवावं. मी सकारात्मक राजकारण करणारा एक कार्यकर्ता आहे. आपली रेस मोठी करणारा कार्यकर्ता आहे. दुसऱ्याची रेस कमी करण्यापेक्षा, आपली रेस कसी वाढेल. त्या पद्धतीने मी काम करतो.
Related
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्याच्या कोपरगाव तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते विवेक कोल्हे यांची नुकतीच विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवड झाली. यानंतर मात्र अहिल्यानगर जिल्ह्यात कोल्हे आणि विखे यांच्यात पूर्वापार चालत आलेली राजकीय संघर्षाची चुणूक दिसून आली. आता कोल्हे विखे यांच्या राजकीय संघर्षाचा नवा अंक सुरु होण्याची चिन्हे दिसत आहेत. याचा प्रत्यय नवनिर्वाचित विधानपरिषदेवरील आमदार विवेक कोल्हे यांच्या ताज्या वक्तव्यातून आले आहे.

