Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
१ जून रोजी दहावीच्या गुणपत्रक व प्रमाणपत्रांचे वाटप

१ जून रोजी दहावीच्या गुणपत्रक व प्रमाणपत्रांचे वाटप

१ जून रोजी दहावीच्या गुणपत्रक व प्रमाणपत्रांचे वाटप

सकाळी ११ वाजता शाळांना, दुपारी ३ वाजता विद्यार्थ्यांना वितरण

राज्य मंडळाचे प्रकटन; मुख्याध्यापक, विद्यार्थी व पालकांनी नोंद घेण्याचे आवाहन

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षेच्या गुणपत्रक, प्रमाणपत्र व इतर शालेय अभिलेखांच्या वाटपाबाबत महत्त्वाचे प्रकटन जारी केले आहे. त्यानुसार सोमवार, १ जून २०२६ रोजी राज्यातील सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांना हे साहित्य वितरित करण्यात येणार आहे.

राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल ८ मे २०२६ रोजी अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन जाहीर करण्यात आला होता.

यानंतर आता गुणपत्रक, प्रमाणपत्र तसेच तपशीलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख यांचे वाटप करण्यात येणार आहे. विभागीय मंडळांमार्फत हे साहित्य संबंधित शाळांना सोमवार, १ जून रोजी सकाळी ११ वाजता देण्यात येईल. त्यानंतर शाळांकडून त्याच दिवशी दुपारी ३ वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रक व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे.

यासंदर्भात सर्व विभागीय मंडळांनी संबंधित माध्यमिक शाळांना सूचना दिल्या असून मुख्याध्यापक, विद्यार्थी व पालकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. दिपर्क माळी यांनी केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital