मुंढर /वार्ताहर: गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रुप ग्रामपंचायात मुंढर कातकिरी या ग्रामपंचायतिच्या सरपंच अमिषा अजित गमरे यांची आदर्श सरपंच म्हणून निवड करून त्यांना सह्याद्रीरत्न गुणगौरव सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे.
पुणे येथील नालंदा ऑर्गनायजेशन या समाजिक संस्थेकडून या पुरस्काराची निवड करण्यात आली आहे.संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व ग्रामीण भागाचे सर्वेक्षण करून आदर्श सरपंच यांची निवड केली जाते.गुहागर तालुक्यातील मुंढर कातकिरी या ग्रुप ग्रामपंचायतीच्या क्रियाशील सरपंच अमिषा अजित गमरे यांची या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गावामध्ये महिला सबळीकरण, विविध विकासकामे , पंचायत समिती, जिल्हा परिषद येथील निधीमधून गावामध्ये विविध योजना सतत्यपूर्ण रबविल्या जात आहेत. गावामध्ये आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, संस्कृती यामध्ये विशेष योगदान आहे. तसेच गावाला विविध पुरस्कार मिळवून देण्यात आदर्श सरपंच अमिषा गमरे यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळेच गाव विकासाच्या मार्गावार आरुढ होत आहे.
या सर्व कामाची दाखल घेऊन पुणे येथील नालंदा
ऑर्गनायजेशन या सामाजिक संस्थेकडून मुंढर गावच्या सरपंच अमिषा अजित गमरे याची आदर्श सरपंच पुरस्कारसाठी निवड करून त्यांना मनाचा समजला जाणारा सह्याद्रीरत्न गुणगौरव सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
अमिषा गमरे यांना मिळालेल्या पुरस्कारमुळे गावातील ग्रामस्थ, विविध समाजिक संस्था तसेच परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

