Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आंबडसमध्ये ग्रामसभेनंतर हाणामारी; आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

आंबडसमध्ये ग्रामसभेनंतर हाणामारी; आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

खेड (प्रतिनिधी) - खेड तालुक्यातील आंबडस ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या ग्रामसभेनंतर निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. या घटनेत एका व्यक्तीस गंभीर दुखापत झाली असून आठ जणांविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार दि. ५ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास आंबडस ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा सुरू होती. ग्रामसभा अर्धवट सोडून काही ग्रामस्थ व फिर्यादी बाहेर येत असताना त्यांच्यात शाब्दिक वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर काही वेळातच हाणामारीत झाले.

यावेळी आरोपींनी फिर्यादी अमोल अशोक खेडेकर (वय ३२, रा. आंबडस गवळवाडी, ता. खेड) तसेच संतोष विठ्ठल करंजकर यांना स्टीलच्या रॉडने तसेच हातापायांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीत अमोल खेडेकर यांना गंभीर दुखापत झाल्याची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे.

दरम्यान, अमोल खेडेकर यांना सोडविण्यासाठी त्यांचे भाऊ अनिल खेडेकर, वहिनी आदिती खेडेकर तसेच वडील अशोक खेडेकर घटनास्थळी आले असता त्यांनाही आरोपींनी शिवीगाळ करत धक्काबुक्की व मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी तुकाराम करंजकर, रोहित करंजकर, संदेश खताते, संदीप करंजकर, विशेष करंजकर, चंद्रकांत करंजकर, संजय करंजकर आणि दिनेश करंजकर (सर्व रा. आंबडस, नक्वाडी) यांच्याविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामसभेनंतर घडलेल्या या घटनेमुळे आंबडस परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital