Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
आंबोली घाटात भला मोठा दगड कोसळला : सुदैवाने जिवीतहानी टळली

आंबोली घाटात भला मोठा दगड कोसळला : सुदैवाने जिवीतहानी टळली

आंबोली । शुभम सावत : आंबोली घाटातील मुख्य धबधब्याच्यालगत असलेल्या जुन्या दरड कोसळलेल्या जागी आज सकाळी भला मोठा दगड थेट रस्त्यावर कोसळला. मात्र, सुदैवाने या वेळी रस्त्यावर कोणतेही वाहन किंवा पर्यटक तसेच प्रवासी नसल्याने मोठी हानी टळली.

रस्त्यावर पडून हा भला मोठा बाजूला गडगडत गेला. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने सदर दगड रस्त्यावरून बाजूला हटवण्यात आला. यादरम्यान काही वेळ दोन्ही बाजूने वाहनांच्या रागा लागल्या होत्या.

दरम्यान, यावर्षी मान्सूनचा पाऊस अजून मोठ्या प्रमाणावर सुरू झाला नसल्याने आंबोली घाटातील धबधबे प्रवाहित झाले नाहीत. अन्यथा या ठिकाणी नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते. त्यामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital