Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या संगीत परीक्षेत श्री सातेरी उद्दींनाथ क्लासच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या संगीत परीक्षेत श्री सातेरी उद्दींनाथ क्लासच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सावंतवाडी : अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, मिरज यांच्या वतीने घेण्यात आलेल्या एप्रिल-मे सत्रातील संगीत परीक्षेत तळवडे येथील श्री सातेरी उद्दींनाथ क्लासच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.

विविध स्तरांवरील परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला.

प्रारंभिक परीक्षेत सोमनाथ बाबली परब, राजाराम दिनेश नाईक, लावण्य कृष्णा मांजरेकर आणि चैतन्य सुनिल घोणसेकर यांनी यश मिळविले. प्रवेशिका प्रथम परीक्षेत वेदांत शेर्लेकर, श्रेयस हरजी, काशिनाथ दळवी, वरद परब, आदित्य दळवी आणि गणेश बांदिवडेकर हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

प्रवेशिका पूर्ण परीक्षेत मंदार चव्हाण, करण परब, धनंजय मिशाळ, गोविंद वेतोरकर, वेदांत आमडोस्कर आणि चैतन्य भोसले यांनी यश संपादन केले. मध्यमा प्रथम परीक्षेत आयुष पवार आणि अर्जुन परब, तर मध्यमा पूर्ण परीक्षेत नित्यानंद बर्डे यांनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत विशेष यश मिळविले.

या सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणांसह प्रथम श्रेणी प्राप्त करून विद्यालयाचा लौकिक उंचावला आहे. त्यांच्या या यशाबद्दल श्री सातेरी उद्दीनाथ क्लासचे संचालक व पखवाज विशारद अनंत (मेहल) महेश कांडरकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील संगीत वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital