Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अंतराळात रडल्यावर अश्रू गालावर का वाहत नाहीत? झिरो ग्रॅव्हिटीमागील रंजक विज्ञान जाणून घ्या

अंतराळात रडल्यावर अश्रू गालावर का वाहत नाहीत? झिरो ग्रॅव्हिटीमागील रंजक विज्ञान जाणून घ्या

# पृथ्वीवर रडल्यानंतर डोळ्यातील अश्रू गालावरून खाली वाहतात, मात्र अंतराळात असे घडत नाही. झिरो ग्रॅव्हिटीमुळे अश्रू खाली न पडता डोळ्याभोवतीच साचून राहतात. याबाबत भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये माहिती दिली आहे.

तसेच प्रसिद्ध अंतराळवीर क्रिस हॅडफिल्ड यांनीही याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवले आहे. या अनोख्या वैज्ञानिक प्रक्रियेची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

नवी दिल्ली : पृथ्वीवर भावनिक झाल्यानंतर डोळ्यातून येणारे अश्रू गुरुत्वाकर्षणामुळे गालावरून खाली वाहतात. मात्र अंतराळातील झिरो ग्रॅव्हिटीमध्ये ही प्रक्रिया पूर्णपणे बदलते. अशा परिस्थितीत अश्रू खाली न वाहता डोळ्यांभोवतीच साचून राहतात, त्यामुळे अंतराळवीरांना वेगळाच अनुभव येतो.

भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी अलीकडेच राज शमानी यांच्या पॉडकास्टमध्ये या विषयावर सविस्तर माहिती दिली. त्याचप्रमाणे जागतिक ख्यातीचे अंतराळवीर क्रिस हॅडफिल्ड यांनी झिरो ग्रॅव्हिटीमध्ये अश्रू कसे वागतात, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही करून दाखवले आहे. या माहितीमुळे अंतराळातील मानवी शरीरातील बदलांविषयी अनेकांना नव्याने माहिती मिळत असून, हा विषय सोशल मीडियावरही चर्चेचा ठरत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital