रत्नागिरी : प्रतिनिधी बहिणीला भेटू नको असे सांगितल्याच्या रागातून तरुणाला चार जणांकडून बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवार 11 जून रोजी रात्री 9 वा.सुमारास मिरकरवाडा येथील खडक मोहल्ला येथे घडली.
उसामा पांजरी, उबेद असलम दर्वे, बुरहान मजगावकर, कामरान मजगावकर (सर्व रा.मिरकरवाडा,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात अजमान दाउद दर्वे (18,मुळ रा.मस्तान मोहल्ला मिरकरवाडा सध्या रा.मिल्लत नगर शिवाजीनगर,रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, मे, 2026 मध्ये संशयित उसामा पांजरी हा अजमानची बहिणी आजरा दर्वे हिला भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेला होता. त्यावेळी फिर्यादीने त्याला तू माझ्या बहिणीला भेटायला येउ नकोस असे सांगितले होते.
त्याचवेळी सायंकाळी फिर्यादी हा काही कामानिमित्त चिटनी बाजार मिरकरवाडा येथे गेला असताना त्याची उसामा पांजरी सोबत वादावादी होउन भांडण झाले होते. दरम्यान, 11 जून रोजी मिरकरवाडा येथील खडक मोहल्ला येथे फिर्यादी गेला असता संशयित उबेद दर्वे समोरुन आला आणि त्याने फिर्यादीच्या हातातील मोबाईलला धक्का दिला व आम्हाला मारण्याची धमकी देतोस अशी विचारणा केली. त्यानंतर उबेदने मोबाईलने फोन करुन अन्य संशयित उसामा पांजरी,बुरहान मजगावकर,कामरान मजगावर या तिघांना त्याठिकाणी बोलावून घेतले. तसेच त्यांचे मित्र अबदुल्ला दर्वेश,रब्बी पांजरी वस्ता,मोहिन मजगावकर, हे सुध्दा त्याठिकाणी आले. त्यातील उसामा पांजरीने फिर्यादीचे टिशर्ट पकडून त्याला मारहाण केली. नंतर उबेद दर्वेने दगड उचलून त्याच्या डोक्यात मारुन दुखापत केली. तर बुरहान मजगावकर आणि कामरान मजगावकर या दोघांनी मिळून हातांच्या ठोशांनी व लाथाबुकक्यांनी फिर्यादीला बेदम मारहाण केली.

