Dailyhunt
भडगावच्या ज्ञानदीप विद्यालयातील दोन विद्यार्थी बालवैज्ञानिक; आयुष बनसोडला रौप्य, विघ्नेश जाधवला कांस्य पदक

भडगावच्या ज्ञानदीप विद्यालयातील दोन विद्यार्थी बालवैज्ञानिक; आयुष बनसोडला रौप्य, विघ्नेश जाधवला कांस्य पदक

खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील भडगाव येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळाच्या कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर, माध्यमिक विभागातील दोन विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत बालवैज्ञानिक म्हणून मान पटकावला आहे.

इयत्ता सहावीतील आयुष बाबासाहेब बनसोड आणि विघ्नेश प्रकाश जाधव यांनी मुंबई विज्ञान शिक्षक असोसिएशनतर्फे आयोजित डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक प्रात्यक्षिक परीक्षेत उत्तीर्ण होत पुढील टप्प्यासाठी पात्रता मिळवली होती.

या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांची मौखिक परीक्षा तसेच 'पृथ्वी प्रणालींमधील परस्परसंबंध आणि मानवी कृती' या विषयावर प्रकल्प सादरीकरण घेण्यात आले. या सर्व टप्प्यांमध्ये उत्तम कामगिरी करत आयुष बनसोड याने रौप्य पदक पटकावले, तर विघ्नेश जाधव याला कांस्य पदक मिळाले. या यशामुळे दोघांची बालवैज्ञानिक म्हणून निवड झाली असून परिसरात त्यांच्या यशाचे मोठे कौतुक होत आहे.

या यशामागे रागिणी जामकर, विनोद टेंबे आणि माधुरी लेले या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी दीपक लढढा तसेच इतर विश्वस्त, सल्लागार मंडळ सदस्य, मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital