ओटवणे (प्रतिनिधी ) ओंकार प्रासादिक भजन मंडळ, सरमळे या भजन मंडळाचे प्रसिद्ध बुवा संजय कृष्णा गावडे यांना राष्ट्रीय संगीत रत्न पुरस्कार जाहीर झाला असून या पुरस्काराचे वितरण पत्रकार भवन ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे कोंकण बुक ऑफ रेकॉर्ड, यशस्वी फौंडेशन सिंधुदुर्ग प्रस्तुत कोंकण कला साहित्य गौरव संमेलनामध्ये मान्यवरांच्या हस्ते शनिवारी ११ वाजता होणार आहे.
गेली कित्तेक वर्षे संजय गावडे बुवा सामाजिक धार्मिक, राजकीय क्षेत्रात अतिशय तळमळीने प्रामाणिक पणे काम करत आहेत. या बरोबरच भजनसेवा, डबलबारी यातून संगीत क्षेत्रातही आपला ठसा उमटवत आहेत याचीच प्रचिती म्हणजे आज केवळ ओटवणे दशक्रोशीत,सावंतवाडी तालुका नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात संजय गावडे बुवांच नाव भजन क्षेत्रात अतिशय आदराने घेतले जाते.भजनातुन,डबलबारी भजनातून ते संगीत कलेच्या प्रसारा बरोबर आध्यात्मिक ज्ञानाचाही प्रचार प्रसार करीत आहेत त्यांनी सातत्याने केलेली कलेची सेवा, कलेवरील प्रेम,मिळविलेले ज्ञान याची पोचपावती आणि दखल म्हणजे कोंकण कला साहित्य गौरव संमेलनाच्या माध्यमातून त्यांना जाहीर झालेला राष्ट्रीय संगीत रत्न पुरस्कार.त्यांना मिळालेल्या या मानाच्या पुरस्काराबद्दल त्यांचे भजन क्षेत्राबरोबरच विविध क्षेत्रामधून अभिनंदन करण्यात येत असुन शुभेच्छा ही देण्यात येत आहेत.

