राजापूर (प्रतिनिधी): पाच राज्यांतील विधानसभा निवडणूकीत भाजपाने पश्चिम बंगाल, आसाम व पुदुचेरी मध्ये घवघवीत यश मिळविले आहे. भाजपाचा हा विजयोत्सव राजापुरात भाजपाच्या वतीने जल्लोषात साजरा करण्यात आला.
राजापुरात जवाहर चौकात फटाके फोडून व मिठाई वाटप करून आणि विजयाच्या घोषणांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हा जल्लोष केला.
या प्रसंगी महिला मोर्चा प्रदेश सचिव शिल्पा मराठे, जिल्हा सरचिटणीस व तालुका पंचायत समिती उपसभापती अभिजीत गुरव, ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव अनिल कुमार करंगुटकर, जिल्हा उपाध्यक्ष शितल पटेल, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष मारुती कांबळे, ज्येष्ठ नेते महादेवराव गोठणकर, तालुका अध्यक्ष मोहन घुमे, शहर अध्यक्ष किरण शिवलकर, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस श्रुती ताम्हणकर, तालुका उपाध्यक्ष रेणुका गुडये, नागेश शेट्टे, विवेक गुरव, मेघनाथ गोसवी, महेश मंणचेकर, सुनील पटेल, श्री. प्रभुदेसाई, नगरसेविका सुयोगा जठार, माजी नगरसेवक नागेश शेटये यांसह शहर व तालुक्यातील भाजपाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवला असून विकासाच्या राजकारणाला मत दिले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातही पक्ष अधिक बळकट होत होत असून भाजपा प्रदेशाध्य रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भविष्यात जिल्हयात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

