Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भुईबावडा तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी मनोहर मोरे यांची बिनविरोध निवड

भुईबावडा तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी मनोहर मोरे यांची बिनविरोध निवड

भुईबावडा : भुईबावडा ग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी श्री. मनोहर भास्कर मोरे यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मनोहर मोरे यांनी यापूर्वीही तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे. तसेच सोसायटीचे चेअरमन म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. सामाजिक कार्यात ते नेहमीच सक्रिय सहभाग घेत असून, गावातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेत असतात.

शांत, संयमी आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे ते भुईबावडा तसेच पंचक्रोशीत आदराने परिचित आहेत. त्यांच्या अनुभवाचा आणि सामाजिक कार्याचा समितीच्या माध्यमातून गावातील सलोखा, शांतता व एकोपा वृद्धिंगत करण्यासाठी निश्चितच फायदा होईल, असा विश्वास ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मनोहर मोरे यांच्या बिनविरोध निवडीबद्दल ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital