Dailyhunt
Breaking News  दापोली विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष स.तु. कदम यांचा राजीनामा; वैयक्तिक कारणांमुळे घेतला निर्णय

Breaking News दापोली विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष स.तु. कदम यांचा राजीनामा; वैयक्तिक कारणांमुळे घेतला निर्णय

खेड (प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला असून, मतदारसंघाचे अध्यक्ष स.तु. कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्याकडे सादर केला आहे.

स.तु. कदम यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, ते सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. मात्र, काही वैयक्तिक अडचणींमुळे त्यांना पक्षाच्या कामकाजासाठी पुरेसा वेळ देणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले आहे.
कदम यांनी आपल्या पत्राद्वारे पक्ष नेतृत्वाकडे विनंती केली आहे की, त्यांचा राजीनामा मान्य करण्यात यावा. त्यांच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात चर्चांना उधाण आले असून, पुढील अध्यक्षपदासाठी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दापोली मतदारसंघात कदम यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी केलेले कार्य लक्षात घेता, त्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षात काही प्रमाणात पोकळी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता पक्ष नेतृत्व या परिस्थितीत काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital