प्रतिनिधी/ रोहन कांबळे
राधानगरी :राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १०४ व्या पुण्यतिथीनिमित्त राधानगरी धरण परिसरात 'शाहू स्मृति केंद्र स्मारक' समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी धरण स्तरावरील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांनी आपल्या भाषणातून शाहू महाराजांनी शिक्षण, सामाजिक न्याय व बहुजन कल्याणासाठी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच समाजात समता व बंधुभाव वाढवण्यासाठी त्यांच्या आदर्शांचे अनुसरण करण्याचे आव्हान करण्यात आले.
तसेच या ठिकाणी असलेल्या दाजीराव विचारे, पिराजीराव घाटगे,महाराणी राधाबाई, सर विश्वेश्वरय्या, छत्रपती राजाराम महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी स्मारक समितीचे अध्यक्ष जि.प.सदस्य अभिजीत तायशेटे, पं.स.सदस्य मोहन पाटील, चंद्रकात चौगुले, चंद्रशेखर कांबळे, उपविभागीय अधिकारी प्रवीण पारकर, दादासो सांगावकर,सचिन भाटळे, भरत कासार, सुरेश बचाटे, महादेव मापसेकर, दयानंद सावर्डेकर,महादेव पाटील,प्रवीण कोरगावकर यांसह शाहू प्रेमी संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

