Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
चिखलीत दर मंगळवारी भरणार गुरांचा बाजार, शेतकऱ्यांना निर्माण होणार संधी

चिखलीत दर मंगळवारी भरणार गुरांचा बाजार, शेतकऱ्यांना निर्माण होणार संधी

गुहागर प्रतिनिधी: रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती आणि चिखली ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने चिखली येथे आठवड्याच्या प्रत्येक मंगळवारी नियमित गुरांचा बाजार भरविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

या बाजारामध्ये गाई, बैल, म्हशी, वासरे, शेळ्या तसेच इतर गुरेढोरे यांची खरेदी-विक्री करण्यात येणार असून जिल्ह्यातील शेतकरी, पशुपालक आणि व्यापाऱ्यांसाठी हे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे.
कोकणातील अनेक भागांमध्ये पशुपालन हा शेतीला पूरक व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र, जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी शेतकऱ्यांना दूरवर जावे लागते. ही अडचण लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती आणि निखली ग्रामपंचायत यांनी पुढाकार घेत हा गुरांचा बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी आणि पशुपालकांना आपल्या जनावरांची विक्री योग्य दरात करता येणार असून खरेदीदारांनाही दर्जेदार जनावरे एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.
या बाजारात विविध जातींच्या गाई, बैल, म्हशी, शेळ्या तसेच इतर पशुधनाची खरेदी-विक्री होणार आहे. यामुळे पशुपालकांना आपल्या
पशुधनाचे योग्य मूल्यमापन मिळण्यास आहे. मदत होणार आहे. तसेच जनावरांच्या व्यापाराला चालना मिळून ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक मजबूत होण्यास हातभार लागणार आहे.
दर मंगळवारी नियमितपणे भरणाऱ्या या गुरांच्या बाजारामुळे चिखली परिसर व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातील पशुपालन व्यवसायाला प्रोत्साहन देणे, शेतकऱ्यांना सहजपणे खरेदी-विक्रीची सुविधा उपलब्ध करून देणे आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे या उद्देशाने सुरू करण्यात आलेला हा उपक्रम निश्चितच शेतकरी व पशुपालकांसाठी लाभदायक ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे. दर मंगळवारी भरणारा हा गुरांचा बाजार भविष्यात जिल्ह्यातील एक प्रमुख पशुधन बाजार म्हणून ओळख निर्माण करेल, असा विश्वास व्यक केला जात
दरम्यान मंगळवारी झालेल्या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समि तीचे सभापती संदीप सुर्वे, माजी आम दार चंद्रकांत मोकल, जिल्हा परिषद पशु व दुग्ध सभापती महेश नाटेकर, सरपंच मानसी कदम, माजी सभापती सुरेश सावंत, भगवान शेठ कदम, मंगेश जोशी, मंगेश कदम आदी उपस्थित होते. यावेळी शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital