तैवानमध्ये आयोजित Computex 2026 प्रदर्शनात Qualcomm च्या Dragonwing IQ10 AI प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या एका प्रगत ह्युमॅनोइड रोबोटचे थेट प्रात्यक्षिक सुरू असताना तो अचानक स्टेजवर खाली पडला.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. कंपनीने हा प्रकार तांत्रिक बिघाडामुळे घडल्याचे स्पष्ट केले असून सुरक्षा यंत्रणेअंतर्गत सेफ-कोलॅप्स मोड सक्रिय झाल्यामुळे रोबोट नियंत्रित पद्धतीने खाली पडल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. या घटनेची सध्या तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी चर्चा सुरू आहे.
तैवान :Computex 2026 या आंतरराष्ट्रीय टेक प्रदर्शनातQualcomm च्या Dragonwing IQ10 AI प्लॅटफॉर्मवर कार्यरत असलेल्या एका प्रगत ह्युमॅनोइड रोबोटचे थेट प्रात्यक्षिक सुरू असताना अनपेक्षित घटना घडली. प्रात्यक्षिकादरम्यान रोबोट अचानक स्टेजवर उताणा पडल्याने उपस्थितांमध्ये काही क्षण संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
घटनेनंतर कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, तात्पुरत्या तांत्रिक बिघाडामुळे रोबोटच्या प्रणालीने 'सेफ-कोलॅप्स' मोड सक्रिय केला होता. या सुरक्षा यंत्रणेमुळे रोबोटने अनियंत्रित हालचाली करण्याऐवजी नियंत्रित पद्धतीने खाली पडण्याची प्रक्रिया स्वीकारली. त्यामुळे स्टेजवरील उपस्थित किंवा उपकरणांना कोणतीही हानी पोहोचली नाही.
या घटनेनंतर AI आधारित रोबोटिक्स, सुरक्षा प्रणाली आणि ऑटोमेटेड सेफ्टी फीचर्स याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारची सुरक्षा यंत्रणा भविष्यातील प्रगत रोबोट्ससाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. दरम्यान, या घटनेमुळे Computex 2026 प्रदर्शनाकडे जगभरातील तंत्रज्ञानप्रेमींचे लक्ष वेधले गेले आहे.

