Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दापोलीत २४ वर्षीय तरुणीचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

दापोलीत २४ वर्षीय तरुणीचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

दापोली: कपडे आणण्यासाठी बाहेर गेलेल्या २४ वर्षीय तरुणीचे अज्ञात व्यक्तीने कोणत्यातरी अज्ञात कारणासाठी पळवून नेऊन अपहरण केल्याची घटना दापोली तालुक्यातील आसूद तुळशीमोहल्ला येथे घडली आहे.

हा प्रकार दिनांक २० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडला असून, याप्रकरणी २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आसूद तुळशीमोहल्ला येथील रहिवासी अन्वरी कलंदर ऐनरकर (वय ४५ वर्षे) यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची मुलगी अफशीन कलंदर ऐनरकर (वय २४ वर्षे) ही २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता आंबवली येथे कपडे आणायला जाते, असे सांगून घरातून बाहेर पडली होती. मात्र, ती बराच वेळ झाला तरी घरी परत न आल्याने नातेवाईकांनी आंबवली गावात जाऊन तिचा शोध घेतला, परंतु ती तिथे मिळून आली नाही. त्यानंतर नातेवाईक, शेजारी आणि आजूबाजूच्या परिसरात सर्वत्र शोध घेऊनही तिचा थांगपत्ता लागला नाही.
अखेर आपल्या मुलीचे कोणीतरी अज्ञात कारणासाठी पळवून नेऊन अपहरण केल्याची खात्री झाल्याने आईने पोलिसांत धाव घेतली. या तक्रारीवरून दापोली पोलिसांनी अज्ञात संशयित आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital