राजापूर (वार्ताहर): कौटुंबिक वादातुन दारुच्या नशेत तालुक्यातील कोदवली मांडवकरवाडी येथील तरूणाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवार २६ मे रोजी घडली.
ओमकार चंद्रकांत मांडवकर वय २७ वर्षे रा.
कोदवली मांडवकर खालचीवाडी असे या मृत तरूणाचे नाव आहे.
मयत ओमकार याने घरामध्ये किचनच्या बाजुला असलेल्या पडवीत साडीच्या काठाने लोखंडी बाराला बांधुन घेवुन गळफास लावुन घेतला. असता त्यास अॅम्ब्युलन्सने राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कौटुंबिक वादातून ओमकार याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यु म्हणून नोंद केली असून अधिक तपास राजापूर पोलिस करत आहेत.

