Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
डेरवण येथे ९ ऑगस्टला ज्युनिअर गट जिल्हा ॲथलेटिक्स निवड चाचणी स्पर्धा

डेरवण येथे ९ ऑगस्टला ज्युनिअर गट जिल्हा ॲथलेटिक्स निवड चाचणी स्पर्धा

त्नागिरी - रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्यावतीने रविवार दिनांक ९ ऑगस्ट २०२६ रोजी ज्युनिअर गट जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धा एसव्हीजेसीटी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, डेरवण येथे होणार आहे.

या स्पर्धेतून निवडण्यात आलेले प्रथम दोन क्रमांकाचे खेळाडू राज्य स्पर्धेमध्ये सहभागी होतील. राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा दिनांक २६ ते ३० ऑगस्ट २०२६ या कालावधीत एसव्हीजेसीटी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, डेरवण येथे रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या यजमानपदखली होणार आहे.\\१४, १६, १८ व २० वर्षाखालील मुले मुली या वयोगटासाठी ज्युनियर गट जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी यासाठी स्पर्धा होणार आहे. स्पर्धा रविवार दिनांक ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजत सुरू होईल. खेळाडूंनी ८.०० वाजता मैदानावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. स्पर्धकांनी शनिवार दिनांक ८ ऑगस्ट २०२६ दुपारी १२.०० वाजेपर्यंत आपले प्रवेश अर्ज ऑनलाईन भरणे आवश्यक आहे.

आपला प्रवेश अर्ज https://forms.gle/q6niASrGqKzb8GT67 येथे भरायचा आहे. प्रथम तीन क्रमांकाच्या खेळाडूना पदक व प्राविण्य प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धेसाठीचा वयोगट - १४ वर्षाखालील मुले व मुली २८.१०.२०१२ ते २७.१०.२०१४ दरम्यान जन्मलेले. १६ वर्षाखालील मुले व मुली २८.१०.२०१० ते २७.१०.२०१२. दरम्यान जन्मलेले १८ खालील मुले व मुली २८.१०.२००८ ते २७.१०.२०१० दरम्यान जन्मलेले. २० वर्षाखालील मुले व मुली २८.१०.२००६ ते २७.१०.२००८. दरम्यान जन्मलेले खेळाडू त्या त्या वयोगटात सहभागी होऊ शकतात.

क्रीडा प्रकार - १४ वर्षाखालील मुले व मुली - ट्रायथलॉन ए (६० मी., लांबउडी, उंचउडी), ट्रायथलॉन बी ((६० मी. धावणे, लांबउडी, गोलफे), ट्रायथलॉन सी (६० मी., लांबउडी, ६०० मी.). १६ वर्षाखालील मुले व मुली - ६० मी., ६०० मी., ८० मी. हर्डल्स, लांबउडी, उंचउडी, गोळा फेक, भालाफेक, पेंटाथलॉन. १८ वर्षाखालील मुले व मुली - १०० मी., २०० मी., ४०० मी., १००० मी., १०० हर्डल्स, लांबउडी, उंचउडी, गोळा फेक, भालाफेक, थाळीफेक, ५००० मी. चालणे. २० वर्षाखालील मुले व मुली - १०० मी., २०० मी., ४०० मी., ८०० मी., १५०० मी., ३००० मी., ५००० मी., ११० मी. हर्डल्स, ४०० मी. हर्डल्स, ३००० मी. स्टिपलचेस लांबउडी, उंचउडी, बांबू उडी, तिहेरी उडी, गोळा फेक, भालाफेक, थाळीफेक, हातोडा फेक, ५००० मी. चालणे. डेकाथलॉन.

तरी रत्नागिरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आव्हान रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब कदम, उपाध्यक्ष श्रीकांत पराडकर, सचिव संदीप तावडे यांनी केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital