Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
डीबीजे महाविद्यालयाला आयएसओचे शैक्षणिक मानांकन

डीबीजे महाविद्यालयाला आयएसओचे शैक्षणिक मानांकन

चिपळूण (प्रतिनिधी) : येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीचे डीबीजे महाविद्यालय (स्वायत्त) हे आयएसओ २१००१-२०१८ या श्रेणीतील शैक्षणिक EOMS हे मानांकन असलेले महाविद्यालय असून, २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून हे मानांकन प्राप्त झाले आहे.

नुकत्याच आय.एस.ओ. च्या तज्ञ समितीने महाविद्यायास भेट देवून गेल्या दोन वर्षापासून प्राप्त झालेल्या मानंकानाच्या नुतनीकरणास मान्यता दिली. शैक्षणिक क्षेत्रात मिळणारे हे मानांकन अत्यंत दुर्मिळ असे मानले जाते. संपूर्ण कोकणात पहिल्यांदा असे मानांकन मिळवणारे डी.बी.जे. हे पहिले महाविद्यालय ठरले आहे.
महाविद्यायास भेट देण्यासाठी आलेल्या या समितीमध्ये पुणे येथील SOAR या मुल्यांकन कंपनीचे प्रमुख श्री. समीर रुपलग व ऑडिटर सौ. सेजल रुपलग यांचा समावेश होता. या समितीने महाविद्यालयातील विविध विभागांना भेटी देवून तेथील पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांशी संवाद, प्राध्यापकांची गुणवत्ता, निकाल, अध्यापन पद्धती, संशोधन तसेच विभागातील बलस्थाने, सुधारणेस वाव असणाऱ्या बाबी, भविष्यातील संधी तसेच असणारी जोखीम यांचे विश्लेषण देखील तपासले. यावरून या समितीने प्रत्येक विभागाला त्यांची गुणवत्ता टिकवण्यासाठी तसेच त्यात आणखी वाढ करण्यासाठी अनेक मोलाच्या सूचना केल्या. आपल्या औपचारिक सभेमध्ये या समितीने डी.बी.जे. महाविद्यालयाला शैक्षणिक क्षेत्रातील आय.एस.ओ. मानांकनाच्या नुतनीकरणासाठी मान्यता देताना अत्यंत आनंद होत आहे, तसेच हे मानांकन टिकवण्यासाठी महाविद्यालयाची स्वायत्तता ही मोलाची कामगिरी पार पाडू शकते, असे मत व्यक्त केले.
या सभेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट, उप-प्राचार्या डॉ. ऋचा खवणेकर, डॉ. चेतन आठवले, महाविद्यालयातील आय.एस.ओ. समितीचे प्रमुख डॉ. बी.एस. कांबळे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उप-प्राचार्या सौ. एस.एस. कुलकर्णी, पर्यवेक्षिका डॉ. एस.एस. खोत, रजिस्ट्रार श्री. विजयेंद्र जाधव तसेच सर्व आय.एस.ओ. समिती सभासद आणि शिक्षक वर्ग उपस्थित होता. सदर ऑडिट पार पाडण्यासाठी न. ए. सोसायटी चे चेअरमन श्री मंगेशजी तांबे सर्व संचालक व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ माधव बापट यांच्या मार्गदर्शनाखाली समिती प्रमुख डॉ. बी. एस. कांबळे व समिती सदस्य डॉ. एस. पी. मोरे, प्रा. व्ही. पी. जाधव, डॉ यू. डी सूर्यवंशी, प्रा. शिल्पा भिडे, प्रा. सावरे, प्रा. पालशेतकर, प्रा. रामटेके, प्रा. सोहोनी, प्रा. इंगळे, प्रा. दाभोळकर, प्रा. साडविलकर, प्रा. कोंकणी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital