Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
एसआयआर मोहिमेत अव्वल कामगिरीबद्दल चिपळूण रिपाइंतर्फे प्रांताधिकाऱ्यांचा सत्कार

एसआयआर मोहिमेत अव्वल कामगिरीबद्दल चिपळूण रिपाइंतर्फे प्रांताधिकाऱ्यांचा सत्कार

चिपळूण विधानसभा मतदारसंघाने राज्यात मारली बाजीचिपळूण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यात राबविण्यात आलेल्या SIR मतदार नोंदणी मोहिमेत चिपळूण विधानसभा मतदारसंघाने अव्वल कामगिरी केल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चिपळूणच्या वतीने उपविभागीय अधिकारी चिपळूण यांचा सत्कार करण्यात आला.

उपविभागीय अधिकारी कार्यालयात झालेल्या या सत्कारप्रसंगी उपविभागीय अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या कार्याचे अभिनंदन करण्यात आले.
या सत्कारप्रसंगी तालुकाध्यक्ष प्रशांत मोहिते, भिले ग्रामपंचायतचे उपसरपंच व तालुका सरचिटणीस उमेश सकपाळ, शहराध्यक्ष मंगेश जाधव, राजेंद्र जाधव, विलास जाधव, राजेश पवार यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता जय भीम, जय संविधानच्या घोषणांनी झाली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital