रत्नागिरी : प्रतिनिधी अज्ञात कारणातून तरुणाच्या घराच्या गॅलरीत दगड मारुन त्याला दुखापत केल्याप्रकरणी एका विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवार 26 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वा.सुमारास तेली आळी आठवडा बाजार येथे घडली आहे.
कारकर (पूर्ण नाव माहित नाही) रा.तेली आळी आठवडा बाजार,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात कृणाल कुष्णकांत जावकर (21, मुळ रा. जावकरवाडी देवगड,सिंधूदुर्ग सध्या रा.तेली आळी आठवडा बाजार, रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, बुधवारी दुपारी 1 वा.सुमारास संशयित कारकर याने फिर्यादी हा घराच्या गॅलरीमध्ये अभ्यास करत असताना अज्ञात कारणातून दगड फेकून मारला. तो दगड फिर्यादी कृणाल याच्या उजव्या हाताच्या मनगटाला लागून मुका मार लागलेला आहे. त्यानंतर संशयिताने फिर्यादी तसेच त्याच्या आत्याला व काकांना शिवीगाळ केली. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

