Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गणेशोत्सवासाठी देवगड एसटी आगार सज्ज

गणेशोत्सवासाठी देवगड एसटी आगार सज्ज

15 ते 27 सप्टेंबरपर्यंत मुंबई, पुणे मार्गावर ज्यादा बसफेऱ्या

आगार व्यवस्थापक सौरभ औंधकर यांची माहिती

देवगड/ प्रतिनिधी

णेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची वाढती संख्या लक्षात घेता एसटी महामंडळाच्या देवगड आगाराकडून मुंबई मार्गावर १५ ते २७ सप्टेंबर या कालावधीत जादा बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

मुंबई, पुणे तसेच इतर भागांतून गणेशोत्सवासाठी देवगड तालुक्यात येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी ही विशेष बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती देवगड आगार व्यवस्थापक सौरभ औंधकर यांनी दिली आहे.

देवगड आगाराकडून प्राप्त माहितीनुसार, ४ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यात व जिल्हाबाहेर जादा बसफेऱ्या चालविण्यात येणार आहेत. यामध्ये मुंबई मार्गावर देवगड- बोरीवली (तळेरे मार्गे) ही बसफेरी दुपारी ३.३० वाजता, ३.४५ वाजता, ४ वाजता, ४.१५ वाजता, ४.३० वाजता, ४.४५ वाजता, सायंकाळी ५ वाजता सोडण्यात येणार आहे. देवगड- मुंबई (तळेरे मार्गे) ही बसफेरी दुपारी ४.१५ वाजता, ४.३० वाजता, ४.४५ वाजता सोडण्यात येणार आहे. देवगड- कुर्ला नेहरूनगर ही बसफेरी दुपारी ४ वाजता, ४.३० वाजता सोडण्यात येणार आहे. देवगड ठाणे ही बसफेरी दुपारी ४.१५ वाजता, देवगड-नालासोपारा ही बसफेरी दुपारी ३ वाजता, तसेच देवगड- पुणे वल्लभनगर ही बसफेरी सकाळी ८.१० वाजता, सायंकाळी ५ वाजता, ५.२० वाजता सोडण्यात येणार आहे. प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घ्यावा. तसेच आवश्यक असल्यास आगाऊ आरक्षण करून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital