Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गोकुळसाठी महायुती एकत्र.

गोकुळसाठी महायुती एकत्र.

छत्रपती शाहू आघाडीची घोषणा…

प्रतिनिधी/ रोहन कांबळे

कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ दूध संघ) निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.मागील महिना-दीड महिन्यांपासून आरोप प्रत्यारोपाने गाजत असलेली गोकुळच्या निवडणुकीला या प्रक्रियेमुळे गती आली आहे.

जिल्ह्यातील दूध उत्पादकांना न्याय देण्यासाठी १६ मार्च १९६३ रोजी गोकुळ दूध संघाची स्थापना झाली.गेल्या ६३ वर्षात संघ जिल्ह्याच्या अर्थकारणाचे केंद्रबिंदू बनला आहे.

दरम्यान आता गोकुळ निवडणुकीसाठी महायुती देखील मैदानात उतरली आहे. 'छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या' माध्यमातून महायुती निवडणूक लढवणार आहे. व याच गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची आज महत्वपूर्ण बैठक पार पडली.

यावेळी बोलताना आमदार डॉ. विनय कोरे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हा सर्वांना महायुतीची बैठक घेण्यासाठी सांगितले होते. त्यानुसार निवडणूक नियोजनाच्या अनुषंगाने आम्हा सर्व नेतेमंडळांची एकसंघपणे अतिशय चांगली चर्चा झाली. महायुती म्हणून आम्ही सगळे एकसंघपणे गेल्यानंतर जिल्ह्यामध्ये अतिशय चांगले चित्र निर्माण होणार आहे.

कोल्हापुरात रेसिडेन्सी क्लबमध्ये दुपारी तीनच्या सुमारास प्रमुख नेतेमंडळींच्या बैठकीत महायुती म्हणूनच निवडणूक लढण्यावर शिकामोर्तब झाले.

या बैठकीस मंत्री चंद्रकांत दादा पाटील, हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर, आ.विनायक कोरे,खा.धनंजय महाडिक यांच्यासह महायुतीच्या नेत्यांची उपस्थिती होती.

गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा महायुतीविरुद्ध सतेज पाटील असा सामना रंगणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital