Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ग्रामपंचायत वडाचापाट कडून आरोग्य साहित्य वाटप!

ग्रामपंचायत वडाचापाट कडून आरोग्य साहित्य वाटप!

सुरे | झुंजार पेडणेकर : वडाचापाट ग्रामपंचायत वतीने गावातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने रक्तदाब गोळ्या व ग्लुकोमीटर स्ट्रिप्स असे आवश्यक वैद्यकीय साहित्य सरपंच सौ. सोनिया दयानंद प्रभुदेसाई व उपसरपंच सचिन पाताडे यांच्या हस्ते आरोग्य उपकेंद्र, माळगाव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

गावातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात तसेच रक्तदाब व मधुमेहाच्या रुग्णांना आवश्यक तपासणी व औषधोपचार मिळावा, या उद्देशाने ग्रामपंचायतीकडून हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी ग्रामपंचायत अधिकारी श्री. लक्ष्मण सरमळकर, श्री. दयानंद देसाई, श्री.प्रथमेश पालव ग्रामस्थ कासले तसेच ग्रामपंचायत कर्मचारी वृंद उपस्थित होते.

ग्रामपंचायतीच्या या आरोग्यविषयक उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital