Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हर्णे येथील मारहाण प्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक; पोलीस कोठडी

हर्णे येथील मारहाण प्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक; पोलीस कोठडी

दापोली (प्रतिनिधी) : दापोली तालुक्यातील हर्णे येथे दोन जणांना मारहाण केल्याप्रकरणी दापोली पोलिसांनी आणखी दोन जणांना अटक केली असून त्याना न्यायालयात हजर केले असता त्यांना 1 जुन पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

हर्णे येथील चिन्मय गुरव व महेंद्र रघुवीर यांना हर्णे गोवा किल्ला येथे 15 ते 20 जणांनी बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या सर्वाना अटक करावी या मागणीसाठी जमावाने हर्णे बायपास व दापोली शहरातील केळसकर नाका येथे रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला होता.
या मारहाण प्रकरणी दापोली पोलिसांनी प्रथम 5 संशयितांना अटक केली होती त्यानंतर आज हर्षद अझीम हुनेरकर व नाईफ आरिफ श्रीवर्धनकर यांना अटक केली आहे.
दरम्यान आज सायंकाळी दापोली पोलीस ठाण्यात हिंदू व मुस्लिम समाजातील प्रमुख मंडळींना बोलावून त्यांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस, पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर उपस्थित होते.

बेकायदा जमाव केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल
दापोली शहरातील केळसकर नाका येथे व हर्णे बायपास निसर्ग हॉटेल समोरील रोडवर बेकायदा जमाव केल्याप्रकरणी दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 27 मे रोजी रात्री 7:30 वाजण्याच्या सुमारास व दिनांक 28 मे रोजी रात्री 1:15 वाजण्याच्या सुमारास हर्णे बायपास येथील निसर्ग हॉटेल जवळ रमेश खोपटकर ,रवींद्र बोरकर ,दत्तात्रय शंकर धाडवे यांनी व त्यांच्यासोबत असलेले 100 ते 150 लोकांनी रस्त्यावर टायर जाळून मा जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचा मनाई आदेश असतानाही त्याचे उल्लंघन करून बेकायदेशीर जमाव जमवून रस्त्याने जाणाऱ्या लोकांना कोणत्याही दिशेस न जाऊ देता वाहने अडवून इच्छापूर्वक अटकाव केला. तसेच दिनांक 27 मे रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास केळस्कर नका दापोली येथे मयूर लहू मोहिते, संदीप राजाराम गायकवाड, राजा पटेल, राकेश प्रवीण भांबेड, सचिन सावंत, संजय सदानंद रहाटे, ओमकार वेल्हाळ ,अमित साळवी, बापू लिंगावळे, प्रणव रेळेकर, बाक्कर, अमरीश हेदुकर, राकेश माळी व त्यांच्यासोबत असलेले 300 ते 350 लोकांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचा मनाई आदेश असतानाही जमाव करून या आदेशाचे उल्लंघन केले. बेकायदेशीर जमावाने रस्त्याने जाणाऱ्या लोकांना इच्छापूर्वक अटकाव केला. म्हणून या सर्वांच्या विरोधात दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव करीत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital