Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हातकणंगले तालुक्यात भावाने केला भावाचा खून.

हातकणंगले तालुक्यात भावाने केला भावाचा खून.

प्रतिनिधी/ रोहन कांबळे

कोल्हापूर :जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे येथे दारूच्या नशेत कौटुंबिक वादातून एका लहान भावाने आपल्या मोठ्या भावाची हत्या केली.सततच्या त्रासाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेण्यात आल्याचे प्राथमिक तपासत समोर आले आहे.

रात्री उशिरा ही थरारक घटना घडली.'आज तुला संपवणारच' असे म्हणत दारूच्या नशेत एक भाऊ कुऱ्हाड घेऊन दुसऱ्या भावाच्या अंगावर गेला. मात्र त्याने हल्ला परतवत पोटात सुरीने वार करत सख्या भावाचा खून केला .अमर बापू चव्हाण (वय ३३) असे मृताचे नाव असून आरोपी किशोर बापू चव्हाण याला अटक केली आहे.

दरम्यान किशोर चव्हाण याला न्यायालयात हजर केले असता त्याला शुक्रवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मृताची पत्नी पीयुषा अमर चव्हाण (वय ३०) यांनी फिर्याद दिली.मृत अमर चव्हाण याला दारूचे व्यसन होते. घटनेच्या दिवशी दुपार पासूनच त्याने दारूच्या नशेत घरातील वस्तूंची तोडफोड केली होती. तसेच पत्नी, भाऊ , काही लोकांशी जोरदार भांडण-वादावादी केली होती. रात्री साडेआठच्या सुमारास त्याने पुन्हा अति मद्यप्राशन करून किशोरच्या घराच्या दरवाजावर लाथा मारत आणि कुऱ्हाडीने प्रहार करत आरडाओरड सुरू केली. संतापलेल्या किशोरने तू रोज रोज त्रास देतोस तुला आता जिवंत ठेवत नाही असे म्हणत अमरच्या पोटात सुरीने वार केला. अमरला पोलिसांनी रुग्णालयात हलवले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.अमर यांच्या मागे पत्नी, दोन लहान मुली व वृद्ध आई-वडील असा परिवार आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक गौरख चौधर करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital