Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जांभारी गावठी बॉम्बस्फोट प्रकरणी मुरादपूर येथील तरूणाला अटक

जांभारी गावठी बॉम्बस्फोट प्रकरणी मुरादपूर येथील तरूणाला अटक

देवरूख (प्रतिनिधी)

यगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जांभारी गावात घडलेल्या गावठी हातबॉम्ब स्फोटाच्या धक्कादायक प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, या प्रकरणी संगमेश्वर तालुक्यातील मुरादपूर येथील एका तरूणाला अटक करण्यात आली आहे.

अविनाश गोपीनाथ खेडेकर असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. या स्फोटात एका महिलेच्या हाताची बोटे निकामी झाल्याची गंभीर घटना घडली होती.

जांभारी गावात गावठी हातबॉम्ब फुटल्याची गंभीर घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. या स्फोटात संबंधित महिलेला गंभीर दुखापत झाली होती. या प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली होती. तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित अविनाश खेडेकर याचे नाव निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या स्फोटाच्या प्रकरणाशी संबंधित इतर संशयितांचा शोध पोलीस घेत असून, जयगड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital